शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

काथ्या उद्योगातून ग्रामीण भागात आर्थिक परिवर्तन : दीपक केसरकर

By admin | Updated: June 3, 2017 17:58 IST

सांगेली येथे काथ्या प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन

आॅनलाईन लोकमत

सिंधुदुर्गनगरी दि. ३ : मानवी जीवनास सहाय्यभूत ठरतो म्हणूनच नारळास कल्पवृक्षाची उपमा दिली जाते. नारळापासून मिळणा-या सोडणा पासून काथ्या बनविण्याची उद्योगातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. यासाठीच महाराष्ट्र राज्य लघु उद्योग महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्र काथ्या उत्पादन व प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येत आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिलांना हमखास रोजगार साधन उपलब्ध होणार आहे. काथ्या उद्योगातून ग्रामीण भागात निश्चित आर्थिक परिवर्तन होईल असा विश्वास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगेली ता. सावंतवाडी येथे व्यक्त केला.

सांगेली येथे ५0 लक्ष रुपये खर्चाच्या काथ्या प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हडी ता. मालवण, परुळे व तुळस ता. वेंगुर्ला येथील केंद्राचे भूमिपूजनही केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.चांदा ते बांदा योजने अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हडी, परुळे, तुलस व सांगेली या ठिकाणी विकेंद्रीत पध्दतीने सामुहिक सुविधा केंद्राची निर्मिती करण्यात येत आहे. या प्रत्येक सामुहिक सुविधा केंद्रामध्ये केंद्राची इमारत, आवश्यक यंत्र सामुग्री व पायाभूत सुविधा या बाबींची व्यवस्था करण्यात येणार आहे. डिफाय बरींग युनिट विलोईंग मशीन- ड्रम टाईप, स्किनिंग मशिन, स्फ्रिनर,कन्व्हेअर विथ रिडक्श्न बॉक्स, हायड्रॉलिक बेलींग प्रेस, विलोईंग मशिन पिन टाईप, स्?पूलिंग मशिन डबल हेड, हायड्रॉलिक मशिनसाठी अ‍ॅटॅचमेंट, इलेक्ट्रॉनिक रॅटस इत्यादी यंत्रसामुग्री बसविली जाणार असून प्रत्येक केंद्रासाठी ५0 लक्ष रुपयांची तरतूद केली आहे.

केवळ काथ्या प्रक्रिया उद्योग एवढ नाही तर चांदा ते बांदा अंतर्गत शेतीच्या यांत्रिकीकरणासाठी भरीव तरतूद केल्याचे स्पष्ट करुन पालकमंत्री केसरकर म्हणाले की, या अंतर्गत भात लावणी, कापणी कोळपणी यंत्रा बरोबरच बचत गटांच्या समुहाला ट्रॅक्टरही दिला जाणार आहे. यामुळे आता महिला भगीनींना भात लावणी व कापणी किंवा शेतीची इतर कामेही करताना कष्ट कमी होतील. केवळ ऊसामुळेच संपन्नता येते अस नाही. श्री पध्दतीने भात लागवड केल्यास भाताचे उत्पादन दीडपटीने वाढते यासाठी भात उत्पादनांतून आर्थिक समृध्दी होण्यास मदत होते. यासाठी भात लागवडीसाठी श्री पध्दतीचा वापर करण्याचे आवाहन केसरकर यांनी केले.

समारंभात महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी प्रास्ताविकात काथ्या प्रशिक्षणाची सविस्तर माहिती दिली. विभागीय व्यवस्थापक प्रभाकर अक्कानवरु यांनी स्वागत केले तर राजेश कांदळगांवकर यांनी आभार मानले.समारंभास मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह तसेच हडी सरपंच महेश मांजरेकर, सभापती मनिषा वराडकर, मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, प्रकाश परब, नितीन वाळके, राजन पोकळे, जि. प. सदस्य हरेश्वर खोबरे, बबन शिंदे, बाबा मोंडकर,निधी मुणगेकर, परुळे सरपंच प्रदीपप्रभू, जि. प. सदस्य म्हापणकर, सभापती यशवंत परब, उपसभापती स्मिता दामले, जि. प. सदस्य नितीन शिरोडकर, प्रणाली बंगे, प्रसन्न देसाई, सचिन देसाई, सभापती रविंद्र मडगांवकर, सरपंच अभय किनळोस्कर, विक्रांत सावंत, रुपेश राऊळ, उपविभागीय अधिकारी खांडेकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.