शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत २० नोव्हेंबर रोजी 'लहान मुलांसाठी खाऊ गल्ली' कार्यक्रम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 13:54 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या कणकवलीत अनेक कला रसिक आहेत. या शहरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. मात्र, लहान मुलांसाठी काही तरी चांगला सांस्कृतिक कार्यक्रम असावा , त्यांना थोडा वेळ तरी विरंगुळा मिळावा यासाठी ' लहान मुलांसाठी खाऊ गल्ली ' या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता जानवली नदीवरील गणपती साना येथे करण्यात आले आहे. अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

ठळक मुद्देकणकवलीत २० नोव्हेंबर रोजी 'लहान मुलांसाठी खाऊ गल्ली' कार्यक्रम !समीर नलावडे यांची माहिती ; सहभागाचे आवाहन

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या कणकवलीत अनेक कला रसिक आहेत. या शहरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. मात्र, लहान मुलांसाठी काही तरी चांगला सांस्कृतिक कार्यक्रम असावा , त्यांना थोडा वेळ तरी विरंगुळा मिळावा यासाठी ' लहान मुलांसाठी खाऊ गल्ली ' या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता जानवली नदीवरील गणपती साना येथे करण्यात आले आहे. अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.कणकवली नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बांधकाम सभापती संजय कामतेकर, नगरसेवक बंडू हर्णे, अभिजित मुसळे, विराज भोसले, संदीप नलावडे , पंकज पेडणेकर आदी उपस्थित होते.समीर नलावडे म्हणाले, २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.०० वाजता या कार्यक्रमाला प्रारंभ होईल . तर सायंकाळी ६.०० वाजता मुंबई , गोवा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलाकारांसमवेत नवीन जुन्या हिंदी, मराठी गीतांचा समावेश असलेली संगीत मैफिल यावेळी होणार आहे. सारेगमप फेम कलाकार या मैफिलीत सहभागी होणार आहेत.या सोबत लहान मुलांसाठी विविध फनी गेम्सची रेलचेलही असणार आहे. विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. कार्यक्रम स्थळी खाद्य पदार्थांचे स्टॉल्स लावू इच्छिणाऱ्यांना मोफत संधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे या खाऊ गल्लीत पालकांनी आपल्या मुलांसह मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.एक दिवस बच्चे कंपनीसाठी !लहान मुलांनी आपल्या पालकांसमवेत या खाऊ गल्लीत यावे आणि मौज मजा करावी. आनंद लुटावा अशी या कार्यक्रम आयोजना मागची माझी भूमिका आहे. त्या भूमिकेला मित्र मंडळींनी पाठींबा दिला असून त्यातूनचएक दिवस बच्चे कंपनीसाठी अशी संकल्पना घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना त्यामध्ये सहभागी करावे. असे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Kankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग