वडाचे झाड कोसळून अपघात
By Admin | Updated: July 27, 2014 23:59 IST2014-07-27T23:53:19+5:302014-07-27T23:59:40+5:30
अपघाताच्या पुनरावृत्तीची शासनाचे अधिकारी वाट पहाताहेत का?

वडाचे झाड कोसळून अपघात
१९९७ साली शिरगांव आंबेखोल येथे देवगड आगाराच्या मुंबई-देवगड या सुपर डिलक्स धावत्या एस. टी. बसवर रस्त्याच्या बाजूला असलेले वडाचे झाड कोसळून अपघात झाला होता. यात तिघा प्रवाशांना प्राणास मुकावे लागले होते. सध्या शिरगांव दशक्रोशीत पाऊस तुरळक असला तरी वाऱ्याचा वेग आहे. वाऱ्याच्या वेगाबरोबर माडखोल येथील जुनाट वृक्ष पडण्याची भिती नागरिकातून व्यक्त केली जात आहे. या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीबाबतही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे. पावसाळ्यात रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी अपघातास आमंत्रण देणारी आहे. या झाडी झुडपांमुळे रस्त्याची साईडपट्टी दिसत नाही अशी स्थिती आहे. रोड कारकून, अभियंता याकडे लक्ष कधी देणार? १९९७ सालच्या आंबेखोल येथील अपघाताच्या पुनरावृत्तीची शासनाचे अधिकारी वाट पहाताहेत का? अशा येथील ग्रामस्थांच्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत.
पुनरावृत्तीची शासन वाट पाहतेय का ?