वाहनचालकांचे परवाने रद्द

By Admin | Updated: January 23, 2015 23:43 IST2015-01-23T23:20:37+5:302015-01-23T23:43:33+5:30

उपप्रादेशिक परिवहनविभागाची कारवाई

Driver's license canceled | वाहनचालकांचे परवाने रद्द

वाहनचालकांचे परवाने रद्द

गिरीश परब - सिंधुदुर्गनगरी -जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान पंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागाच्या विशेष पथकामार्फत अवैध वाहतूक व क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या १० वाहनचालकांचे परवाने १५ दिवसांत रद्द केले आहेत. तसेच वाहन कर (टॅक्स) बुडविणाऱ्या २00 वाहनांवर कारवाई करीत त्यातून ३९ लाख रुपयांचा दंडही घेतला आहे.
उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत सिंधुदुर्गात ११ ते २५ जानेवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत वाहनधारकांमध्ये जनजागृती केली जात आहे. नियम धाब्यावर बसवून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात एक फिरते विशेष पथक कार्यरत असून, बेकायदा वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करीत आहे. सुरक्षा पंधरवड्यात या पथकाने शिरोडा येथील नऊ खासगी रिक्षाधारकांना अवैधप्रवासी वाहतूक केल्याप्रकरणी कारवाई केली असून, सर्व रिक्षा नजीकच्या पोलीस ठाण्यात लावल्या आहेत. त्यांच्याकडून ३० हजारांचा दंडही वसूल केला असून, या सर्व चालकांचे परवाने सात दिवसांसाठी निलंबित केले आहेत. वाहनचालकांना लाखोंचा दणकाजिल्ह्यातील काही वाहनधारक ‘वाहन कर’ भरत नाहीत, अशा वाहनचालकांच्या विरोधात या दरम्यान केलेल्या कारवाईत शेकडो वाहनचालकांनी टॅक्स भरला नसल्याचे उघड झाले असून, अशा वाहनधारकांकडून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या विशेष भरारी पथकाने तब्बल ३९ लाख रुपयांचा दंडही वसूल केला आहे.

उपप्रादेशिक परिवहनविभागाची कारवाई
३९ लाख रुपयांचा दंड जमा

२०० वाहनचालकांवर कारवाई
अवैध प्रवासी वाहतूक, क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणाऱ्या तब्बल २०० वाहनधारकांवर आरटीओ विभागाने या पंधरा दिवसांत कारवाई केली. त्यातून सहा लाख रुपयांचा दंडही वसूल केला आहे. ही कारवाई मोटारवाहन निरीक्षक यु. आर. पाटील, पी. आर. रजपूत, उदय पाटील, सागर भोसले यांच्या पथकाने केली आहे.

Web Title: Driver's license canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.