शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

चालकानेच रचला दरोड्याचा बनाव

By admin | Updated: June 14, 2017 23:50 IST

चालकानेच रचला दरोड्याचा बनाव

लोकमत न्यूज नेटवर्कलांजा : महामार्गावर आपली गाडी अडवून दरोडेखोरांनी आपल्यावर धारदार शस्त्राने वार केले आणि आपल्याकडील दोन लाख रुपये लुटून नेले, अशी तक्रार करणारा वाहनचालक महेश पालव यानेच दरोड्याचा बनाव रचला असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. लांजा पोलीस आणि रत्नागिरीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या तपासात ४८ तासांतच हा बनाव उघड झाला आहे.पालव याने तपासाप्रसंगी लांजा पोलीस व गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना टोलवाटोलवी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसी हिसका बसताच पालव याने हा सर्व प्रकार आपणच घडवून आणल्याचे सांगितले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.रत्नागिरी येथील जागृत मोटर्स या कंपनीमध्ये महेश अरुण पालव हा गेली पाच वर्षे चालक म्हणून कामाला आहे. दि. ११ जूनला सकाळी ९ वा. कामावर आल्यावर त्याने रत्नागिरी-गवळीवाडा येथील मित्र आप्पा परब याला फोन करून रात्री आठ वाजता लांजा रेस्ट हाऊस येथील पेट्रोलपंपाजवळ बोलावले. पालव दुपारी १.४५ वा रत्नागिरीहून कुडाळकडे निघाला. राजापूर, कुडाळ आणि नंतर कणकवली अशा तीन ठिकाणी जमा झालेले पैसे घेऊन त्याने परतीचा प्रवास सुरू केला.रात्री आठच्या दरम्यान तो लांजा पेट्रोलपंप येथे आला. आप्पा परब त्याची तेथे वाट पाहत होता. पालवने आप्पा परब याच्याकडे बंद लखोट्यात भरून २ लाख ३६ हजार रुपये दिले. लांजा येथेच एका पानटपरीवर पालवने ब्लेड घेतले आणि तो पुढे निघाला. वेरळ घाट उतरून एक ते दीड किलोमीटर पुढे गेल्यानंतर गाडी थांबविली. खाली उतरून स्वत:च्या अंगावर ब्लेडने उजव्या हातावर व छातीवर वार केले. त्याच्या गाडी मागोमाग मोटारसायकल घेऊन येणाऱ्या आप्पा परब याच्याच मोटारसायकलवर बसून पालव पाली पोलीस ठाण्यात पोहचला व बनाव रचलेली कथित कथा सांगितली आणि पाली शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला.या घटनेची दखल घेत लांजा पोलीस निरीक्षक विकास गावडे यांनी आपले कर्मचारी घेऊन पाली गाठली. त्यांनी वरिष्ठांना याची कल्पना दिल्यानंतर पोलीस अधीक्षक प्रणव अशोक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांनी तेथे भेट देऊन मार्गदर्शन केले. उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास गावडे यांनी लगेचच तपास सुरू केला. गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक शिरीष ससाणे व त्यांचे पथकही आपल्या पद्धतीने तपासात सक्रिय झाले.पालव याच्या जबानीतील विसंगतीमुळे हा बनाव पोलिसांनी चाणाक्षपणे उघड केला. आता याबाबतची पुढील कार्यवाही लांजा पोलिसांनी हाती घेतली आहे.यामुळेच पोलिसांना आला संशयमहेश पालव याने दिलेल्या जबाबात काही विसंगती होत्या. त्याच्या हातावर व छातीवर झालेले वार चाकूचे नसून ते ब्लेडचे आहेत. ते वार खोलवर नाहीत, असे मत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले होते. गाडीच्या दरवाजात पडलेले रक्त, मुंबई-गोवा महामार्गावर ८.३० च्या दरम्यान असलेली वर्दळ अशा अनेक गोष्टींमुळे पोलिसांची संशयाची सुई महेश पालव याच्यावरच होती.