नाटळमध्ये फुलला भक्तीचा सोहळा

By Admin | Updated: February 1, 2015 00:34 IST2015-02-01T00:34:45+5:302015-02-01T00:34:45+5:30

वास्तुशिल्प कलेचा उत्कृष्ट नमुना

Drama full of devotional ceremony | नाटळमध्ये फुलला भक्तीचा सोहळा

नाटळमध्ये फुलला भक्तीचा सोहळा

कनेडी : वास्तुशिल्प कलेचा उत्कृष्ट नमुना असलेले जिल्ह्यातील एक धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास येणाऱ्या नाटळ गावचे जागृत ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाची मानकऱ्यांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली.
भक्तांच्या हाकेला धावणारा देव म्हणून श्री देव रामेश्वर माऊलीची ख्याती आहे. वार्षिक अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त विधीवत घटस्थापनेने सुरूवात झाली. यानिमित्त अखंड भजने, दिंड्या, चित्ररथ, लेझीम पथके, ढोलवादन, फटाक्यांची आतषबाजी होणार आहे. माघी एकादशीपासून रोज रात्री श्री देव रामेश्वर माऊलीची सवाद्य देवतरंग पालखी प्रदक्षिणा होत आहे. हरिनाम सप्ताहानिमित्त मंदिरावर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
चाकरमान्यांसह माहेरवाशिणी व भाविक गावात दाखल झाले आहेत. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता हरिनाम सप्ताहाच्या समाप्तीनिमित्त स्थापित मंगलघटाचे नदीपात्रातील डोहात देवतरंग व भाविकांच्या उपस्थितीत विसर्जन होणार आहे. यानंतर भाविकांचे कौलप्रसाद कार्यक्रम होईल. ४ फेब्रुवारी रोजी महाप्रसाद व रात्री १० वाजता दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Drama full of devotional ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.