शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदे मातोश्रीवर आल्यास आश्चर्य वाटायला नको, विनायक राऊतांचे भाकीत

By अनंत खं.जाधव | Updated: August 14, 2023 16:13 IST

पत्रकारांशी सोडा पंतप्रधान संसदेत येऊन बोलत नाहीत 

सावंतवाडी : राष्ट्रवादीचा एक गट अजित पवार यांच्यासमवेत सरकारमध्ये समाविष्ट झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह त्यांच्यासोबत गेलेले 40 आमदार सध्या अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे भविष्यात शिंदे माफी मागायला मातोश्रीवर आले तर आर्शचय वाटायला नको असे भाकीत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी वर्तविले.मात्र याचा सर्वस्वी निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचाच असल्याचे मत ही यावेळी व्यक्त केले. ते सावंतवाडी येथे एका शैक्षणिक कार्यक्रमानिमित्त आले असता पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बाबुराव धुरी मायकल डिसोझा, बाळू माळकर, बाळा गावडे, आबा सावंत, श्रुतिका दळवी आदी उपस्थित होते.राऊत म्हणाले, शिक्षणमंत्री दिपक केसरकर व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात विस्तव सुध्दा जात नाही. दोघांत स्पर्धा वाढली आहे. त्याचे टोकाचे वाद हे सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या विकासाच्या आड येत आहेत. पण ते योग्य नाही. पत्रकारांशी सोडा पंतप्रधान संसदेत येऊन बोलत नाहीत मणिपूर सारखे राज्य गेले तीन महिने पेटत आहे. त्याकडे बघायला कोणाला वेळ नाही. संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ दोन ते तीन महिने बोलतात याला काय म्हणायचे पंतप्रधान पत्रकारांशी सोडा संसदेत येऊन बोलत नाहीत पण त्यांना काय म्हणायचे असा सवाल ही त्यांनी यावेळी केला.भविष्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची वाटचाल खडतर आहे. त्यांच्या सोबत गेलेल्यांना उमेदवारी मिळणार की नाही यात शंका आहे. त्यातच अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे आणखी अस्वस्थ झाले असून भविष्यात मातोश्रीवर माफी मागण्यास आले तर आर्शचय वाटायला नको असे भाकित त्यांनी व्यक्त केले. हत्ती हटावसाठी आसाम ऐवजी कर्नाटक मधून टीम बोलवाहत्तीचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्यासाठी आसाम येथील पथक न आणता कर्नाटक मधील पथक आणा मी स्वत: यासाठी पूर्ण सहकार्य करेल. मागच्या वेळचा इतिहास पाहता कर्नाटकमधीलच तज्ञ लोक हत्तीचा बंदोबस्त करतील असेही राऊत म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVinayak Rautविनायक राऊत Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे