शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गैरसोय होऊ देऊ नका, कामे तातडीने मार्गी लावा : समीर नलावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 19:46 IST

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत  कोणत्याही परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होऊ देऊ नका, अशा सूचना नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिलीप बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांना बुधवारी दिल्या. तसेच आगामी काळात नागरिकांच्या आलेल्या सूचना लक्षात घेऊन त्यांची गैरसोय दूर करा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

ठळक मुद्दे गैरसोय होऊ देऊ नका, कामे तातडीने मार्गी लावा : समीर नलावडेनलावडे यांची दिलीप बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांना सूचना

कणकवली : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत  कोणत्याही परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होऊ देऊ नका, अशा सूचना नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिलीप बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांना बुधवारी दिल्या. तसेच आगामी काळात नागरिकांच्या आलेल्या सूचना लक्षात घेऊन त्यांची गैरसोय दूर करा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत कणकवली प्रांत कार्यालयासमोर तयार करण्यात आलेल्या सर्व्हिस रोडवर ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर येत आहे. शहरातील अनेक पथदीप बंद आहेत. बिजलीनगरकडे जाणाऱ्या नागरिकांचा रस्ता बंद करण्यात आला आहे. गटारांची कामे अर्धवट आहेत. ही कामे येत्या पाच दिवसांत पूर्ण करा, अशा सूचना समीर नलावडे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केल्या.कणकवली नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष दालनात शहरातील नागरिकांसमवेत दिलीप बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांची विविध समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीला बांधकाम सभापती संजय कामतेकर, नगरसेवक शिशिर परुळेकर, दिलीप बिल्डकॉनचे कपिल कुमार, उद्यकुमार चौधरी, अनुप शर्मा, राजू गवाणकर, किशोर राणे, अजय गांगण, राजन परब, मंदार मराठे, गितेश परब, जुवेकर, दुखंडे, अभय राणे आदी उपस्थित होते.यावेळी विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. कणकवली शहरातील प्रश्नांबाबत गांभिर्याने काम करा. कणकवलीत अ‍ॅड. उमेश सावंत यांच्या घराशेजारी असलेल्या नाल्याच्या पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. त्याठिकाणी अद्याप बांबू, लोखंड, दगड आडवे पडलेले आहेत. त्यामुळे ड्रेनेजचे पाणी तुंबलेल्या अवस्थेत राहिल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे.या ड्रेनेजमुळे संजीवनी हॉस्पिटलर्यंत पाण्याला फुग मारलेली आहे. त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे अनेकांच्या घरात पाणी पहिल्याच पावसात जाण्याची भीती आहे. त्यामुळे आतापासूनच हा नाला पूर्ण साफ करा. तसेच शहरातील पथदीप अनेक ठिकाणी बंद आहेत, त्यांची दुरुस्ती करा. गटारांची कामे अर्धवट आहेत ती मार्गी लावा. सर्व्हिस रस्ते खड्डेमय बनले आहेत. त्यांचे पुन्हा डांबरीकरण करा, अशा सूचना समीर नलावडे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केल्या.छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवरायांचा पुतळा हलविण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. त्याचबरोबर उड्डाणपुलाला कोणाचे नाव द्यायचे? हे नगरपंचायत सभेत ठरविले जाईल. त्यामुळे कोणीही नावे सुचवून अधिकार नसताना जनतेची दिशाभूल करू नये. शहरातील नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. धुळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातत्याने पाणी मारून धुळीवर नियंत्रण ठेवा, असे दिलीप बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांना समीर नलावडे यांनी सांगितले.

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग