शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दोडामार्ग भाजपा तालुका कार्यकारिणी बरखास्त, जिल्ह्यातील आणखीन दोन पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 17:28 IST

ज्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत चांगले काम केले त्यांना पुन्हा संधी दिली जाणार

कणकवली : दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीत पक्षांतर्गत गटबाजी करून पक्षविरोधी कुरघोड्या केल्याबद्दल त्या तालुक्याची भाजपा पक्ष कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत आहे. अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली. तसेच सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेवून नवीन कार्यकारिणी तयार करताना ज्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत चांगले काम केले त्यांना पुन्हा संधी दिली जाणार आहे. नूतन कार्यकारिणी निवड होईपर्यंत भाजपचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रमोद कामत आणि महेश सारंग हे दोडामार्ग प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत,असेही ते म्हणाले. कणकवली येथील भाजप कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप कणकवली तालुकाध्यक्ष संतोष कानडे, पंचायत समिती सभापती मनोज रावराणे, बबलू सावंत, सुशील सावंत आदी उपस्थित होते. राजन तेली म्हणाले, जिल्हा बँक ते नगरपंचायत निवडणुकीत काही भाजपा कार्यकर्त्यानी पक्षविरोधी काम केल्याचा फटका पक्षाला बसला आहे. ही बाब पक्षाने गांभीर्याने घेतली आहे.  याप्रकाराबाबत लवकरच कारवाई करणार असल्याचे आपण यापूर्वी जाहीर केले  होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात येत आहे. 

त्याचप्रमाणे  जिल्हा बँक निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याबद्दल आज (मंगळवारी) जिल्ह्यातील दोन पदाधिकाऱ्यांना बडतर्फीची कारवाई का करू नये ? अशी कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचेही तेली यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपा