शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दोडामार्ग, बांदा परिसराला वादळी पावसाचा तडाखा; सिंधुदुर्गमध्ये झाडे पडल्याने रस्ते बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 14:06 IST

मणेरी तळेवाडी उद्ध्वस्त

दोडामार्ग : विजांचा लखलखाट व ढगांच्या गडगडाट करीत वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मान्सूनपूर्व पावसाने बुधवारी तालुक्यात हाहाकार माजविला. अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. मणेरी तळेवाडी येथे घरांचे पत्रे उडाले. विद्युत खांब जमीनदोस्त झाले. वाहने व घरांवर झाडे पडली. एकंदरीत संपूर्ण तळेवाडीतील ग्रामस्थांचे अतोनात नुकसान झाले.दरम्यान, दोडामार्गप्रमाणेच बांदा दशक्रोशीलाही वादळी पावसाने तडाखा दिला. सावंतवाडी शहरातही पावसाने काही ठिकाणी पाणी साचले होते. सिंधुदुर्गनगरीत वादळी पावसाने अनेक झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.दोडामार्ग तालुक्यात मागील दहा दिवसांपासून वळिवाचा पाऊस हजेरी लावत आहे. सुरुवातीला दिवसाआड लागणारा पाऊस आता दररोज कोसळत आहे. बुधवारी सकाळी वातावरण नेहमीप्रमाणेच होते. मात्र, दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक ढग जमा होऊ लागले. हळूहळू विजांचा लखलखाट सुरू झाला. यावेळी मेघगर्जनाही होऊ लागली. सोसाट्याचा वारा वाहू लागला अन् सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली.शहरातील नागरिकांची तारांबळ उडाली. विद्युत पुरवठा खंडित झाला. वाऱ्यासहित आलेल्या पावसामुळे दोडामार्ग-विजघर राज्य मार्गावर अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. याचा विपरित परिणाम वाहतुकीवर झाला. या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू होती.

मणेरी तळेवाडी उद्ध्वस्तमणेरी तळेवाडी येथे पावसाने अक्षरशः झोडपून काढले. तळेवाडी ते आंबेली या मुख्य रस्त्यावर मोठमोठी झाडे उन्मळून पडली. त्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. अनेक ग्रामस्थांच्या घरावरील पत्रे उडून गेले. त्यामुळे पावसाचे पाणी घरात तुंबले. विद्युत खांब जमीनदोस्त झाले. वाहनांवरही झाडे, पत्रे पडल्याने काचा फुटल्या. एकंदरीत या पावसामुळे तळेवाडीतील सर्वच ग्रामस्थांचे अतोनात नुकसान झाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस