डॉक्टर रजेवर गेल्याने रूग्णांचे हाल
By Admin | Updated: October 26, 2014 00:09 IST2014-10-26T00:08:10+5:302014-10-26T00:09:04+5:30
जिल्हा रूग्णालयातील समस्या

डॉक्टर रजेवर गेल्याने रूग्णांचे हाल
ओरोस : जिल्हा रुग्णालयात दिवाळीनिमित्त डॉक्टर रजेवर गेले असून जिल्हा रुग्णालयाची अवस्था दयनीय झाल्याचे चित्र दिसत आहे. रुग्ण तपासणीसाठी चार चार तास केसपेपर काढून बसल्यानंतर त्यांना डॉक्टर रजेवर असल्याचे कळते. त्यामुळे रूग्णांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
ओरोस जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची संख्या कमी असून त्यात डॉक्टर रजेवर गेल्याने रुग्णांचे अतोनात हाल झाले आहेत. रजेवर जाणाऱ्या डॉक्टरांनी मुख्य डॉक्टरांना रजेवर जात असल्याचे कळविले नसल्याने रुग्णांनी केसपेपर काढून रांगा लावल्या होत्या. रुग्ण चार-चार तास ताटकळत राहिले.
दंत शल्यचिकित्सक यांच्याकडे केसपेपर काढून १० ते १२ जण बाहेर बसलेले होते. यामध्ये सुप्रिया घाडीगांवकर, मनोहर घाडीगांवकर, वैशाली परब, धोंडीराम गावडे, अनंत मुणगेकर या रुग्णांनी केसपेपर काढून पुन्हा घरी जाणे पसंत केले. त्यामुळे आधीच या रुग्णालयाची अवस्था बिकट होत चालली असून अधिकारीवर्ग रजेवर गेल्याने रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांचे हाल होत आहेत. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)