डॉक्टर मारहाण प्रकरणाचा निषेध

By Admin | Updated: November 16, 2014 23:49 IST2014-11-16T21:49:56+5:302014-11-16T23:49:33+5:30

दोडामार्गमध्ये फलक : कर्मचारी, अधिकाऱ्यांकडून संताप

Doctor Behind the matter | डॉक्टर मारहाण प्रकरणाचा निषेध

डॉक्टर मारहाण प्रकरणाचा निषेध

दोडामार्ग : जिल्हा रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. विजय ढवळे यांना झालेल्या मारहाणीचा दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त केला. येथील रुग्णालयाच्या बाहेर निषेधाचा फलक लावण्यात आला असून अशा घटना निंदनीय असल्याचे मत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले. दोन दिवसांपूर्वीच जिल्हा रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. विजय ढवळे यांना मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा सर्व वैद्यकीय अधिकारी संघटना व कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त असून ही घटना निंदणीय असल्याच्या प्रतिक्रीयाही उमटत आहेत. ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीही निषेधाचा फलक लावून आपला निषेध व्यक्त केला. (प्रतिनिधी)

Web Title: Doctor Behind the matter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.