आराखडा कागदावर राहू नये

By Admin | Updated: October 30, 2015 23:10 IST2015-10-29T23:49:15+5:302015-10-30T23:10:11+5:30

वैभव नाईक यांच्या सूचना : मालवण तालुका पाणीटंचाई आढावा बैठक

Do not stay on paper | आराखडा कागदावर राहू नये

आराखडा कागदावर राहू नये

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी पावसाची सरासरी ४० टक्क्याहून कमी आहे. त्यामुळे पाणी टंचाईच्या झळा पोहचण्यापूर्वी तयार केलेला पाणी टंचाईचा आराखडा कागदावर राहू नये. पाणी टंचाई भासू नये यासाठी प्रत्येकाने खबरदारी घ्यावी. त्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे. पक्षीय राजकारण करता आपल्या आमदार निधीतून निधी उपलब्ध करून दिला जाईल. विंधन विहिरींच्या गाळ उपसासाठी असणारी अत्याधुनिक मशीन यंत्रणाही जिल्ह्यात उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन आमदार वैभव नाईक यांनी दिले.मालवण तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणाबाबत गुरुवारी तालुका स्कूल येथे आढावा सभा सभापती सीमा परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर आमदार वैभव नाईक, उपसभापती देवानंद चिंदरकर, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, तहसीलदार वनिता पाटील, जिल्हा परिषद सदस्य संग्राम प्रभुगावकर, संजीवनी लुडबे, पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर, राजेंद्र्र प्रभुदेसाई, हिमाली अमरे, ग्रामविस्तार अधिकारी पी. डी. जाधव, पाणीपुरवठा विभागाचे वैभव वाळके तसेच तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, गरम पाणीपुरवठा समिती अध्यक्ष उपस्थित होते. आजच्या सभेस यांत्रिकी विभागाचा एकही अधिकारी उपस्थित न राहिल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गतवर्षी ७० विंधन विहिरी घेण्यात आल्या होत्या. मात्र, केवळ दोनच कामांना मंजुरी मिळत असेल तर कागदपत्रे गोळा करून उपयोगच काय? असा सवाल नाईक यांनी उपस्थित केला. तालुक्यात पाणी टंचाईसाठी अत्यावश्यक ठिकाणी आमदार निधी उपलब्ध करून देवू असे आश्वासन त्यांनी दिले. (प्रतिनिधी)

आवश्यक असल्यास फौजदारी करा : पराडकर
सभापती परुळेकर यांनी काही गावात विहिरींची कामे अपूर्ण राहिल्याबाबत नाराजी व्यक्त केली. यावर गटविकास अधिकारी पराडकर यांनी या कामांना मंजुरी, देखरेख, निधी हे सारे अधिकार ग्रामसभेला असतात. आवश्यकता असल्यास फौजदारी दाखल करावी असेही सुचित केले. काही ठिकाणी विंधन विहीर अथवा नळपाणी योजनेसाठी बसवण्यात येणाऱ्या पंपासाठी आवश्यक ती कागदपत्रे देऊन मीटर बसविण्याच्या सूचना पराडकर यांनी केल्या.


वैभव नाईक : पाणी टंचाईवर मात करूया
वैभव नाईक म्हणाले, शासनाच्या अनेक योजना आहेत. या योजनांपासून सरपंचानी सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यावा. जलयुक्त शिवार योजनेतून मालवण तालुक्याला साडे चार कोटीचा निधी खर्च करण्यात आला आहे. आगामी काळात योजनेंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील जास्तीत जास्त गावांनी सहभागी होऊन पाणी टंचाईवर मात करावी, असे आवाहन केले.
जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत तालुक्यात जास्तीत जास्त गावांनी सहभाग घेत आपले गाव कायमस्वरूपी टंचाईमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावे. प्रत्येक ग्रामपंचायतीने बंधाऱ्यांचे उद्दिष्ट पूर्ण करताना आजपासून जाहीर करण्यात आलेला बंधारा पंधरवडा या कार्यक्रमा अंतर्गत असलेले पाणी साचवून तालुक्याचे १६०० बंधाऱ्यांचे उद्दिष्ट पूर्ण करून पाणी टंचाईवर मात करूया, असे आवाहनही नाईक यांनी केले.
 

Web Title: Do not stay on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.