शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

बॅक डेटने कामांना मंजुरी देऊ नका : के. मंजुलक्ष्मी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 13:04 IST

१७ व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचार संहिता १० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून सुरु झाली आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही कामाला बॅक डेटने मंजुरी देऊ नका, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी सोमवारी आपल्या खातेप्रमुखांना दिल्याचे समजते.

ठळक मुद्देबॅक डेटने कामांना मंजुरी देऊ नका : के. मंजुलक्ष्मी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे प्रशासनाला आदेश

सिंधुदुर्गनगरी : १७ व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचार संहिता १० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून सुरु झाली आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही कामाला बॅक डेटने  मंजुरी देऊ नका, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी सोमवारी आपल्या खातेप्रमुखांना दिल्याचे समजते.केव्हाही आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याचे लक्षात आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुलक्ष्मी यांनी शनिवार व रविवार शासकीय सुट्टी असताना कार्यालयात हजर राहून आवश्यक कामे पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार या दोन्ही दिवशी जिल्हा परिषदेतील कार्यलये सुरु होती. रविवारी संध्याकाळी ५ वाजता निवडणूक आयुक्तांनी १७ व्या लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा केल्याने संपूर्ण देशात आचार संहिता लागू झाली आहे.परिणामी आता कोणत्याही नवीन कामांना मंजुरी देणे, ई-निविदा प्रसिद्ध करणे, कार्यारंभ आदेश देणे ही प्रशासकीय पातळीवरील कामे थांबणार आहेत. तसे केल्यास निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका येऊ शकतो. त्यामुळे सोमवारी मंजूलक्ष्मी यांनी कोणत्याही कामांची बॅक डेटने पूर्तता करावयाची नाही, असे आदेशच आपल्या प्रशासनाला बजावले आहेत.मोठ्या प्रमाणावर निधी अखर्चीत राहणारदरम्यान, १० मार्च रोजी सुरु झालेली आचारसंहिता २७ मे पर्यंत सुरु राहणार आहे. २३ एप्रिल रोजी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी निवडणूक होत असली तरी निवडणूक आयुक्तांनी २७ मे पर्यंत आचारसंहिता लागू राहणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे यावर्षी जिल्हा परिषदेचा खर्च १०० टक्के होणार नाही. जिल्हा नियोजनने जिल्हा वार्षिक योजनेच्या कामांची यादी नुकतीच दिली आहे. त्याचेही सोपस्कार पूर्ण करावयाचे राहिलेले आहेत. जिल्हा परिषदेचा स्वनिधी खर्च फेब्रुवारी अखेरपर्यंत ४० टक्केच झाला होता. त्यामुळे हा निधीही मोठ्या प्रमाणात अखर्चित राहण्याची शक्यता आहे.ग्रामीण विकासाला खीळ बसणार२७ मे पर्यंत आचार संहिता राहणार आहे. तर याच दरम्यान जिल्ह्यात पाऊस सुरु होतो. त्यामुळे रस्ते, शाळा दुरुस्ती, नवीन इमारती हि कामे निश्चितच रखडणार आहेत. लोकसभेची आचारसंहिता असल्याने निधी खर्चाचे नियोजन वेळेत करा, अशी मागणी पदाधिकारी व जिल्हा परिषद सदस्य वारंवार करीत होते. तरीही निधी मोठ्या प्रमाणात अखर्चित राहणार असल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाला खीळ बसणार आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदsindhudurgसिंधुदुर्ग