दिव्यांग तरुणीवर बलात्कार

By Admin | Updated: March 2, 2017 23:39 IST2017-03-02T23:39:36+5:302017-03-02T23:39:36+5:30

वांझोळे येथील घटना; आरोपी अटकेत: विवाहित तरुणाचे कृत्य

Divyang gangrape rape | दिव्यांग तरुणीवर बलात्कार

दिव्यांग तरुणीवर बलात्कार



देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे भोईवाडीतील तरुणीच्या बहिरे व मुकेपणाचा गैरफायदा घेत ताम्हाने येथील विवाहित तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी उघडकीस आला आहे. ही घटना जानेवारी २०१७ मध्ये घडली होती. या नराधमावर देवरूख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आला आहे.
नागेंद्र पिराजी देसूरकर (वय ४०, रा. ताम्हाने फाटा) असे आरोपीचे नाव आहे. नागेंद्र हा विवाहित आहे. त्याने आपल्या पत्नीच्या सोबतीला पीडित तरुणीला बोलावले होते. ही तरुणी सुमारे २० वर्षांची असून, मूकबधिर आहे. त्याची पत्नी दुपारी देवतेच्या पूजनासाठी घराबाहेर पडली. घरी कोणीच नसल्याचे व तरुणीच्या अपंगत्वाची संधी साधून नागेंद्रने तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार कोणास सांगशील तर ठार मारून टाकीन, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पीडित तरुणीच्या अचानक पोटात दुखू लागल्याने रुग्णालयात नेण्यात आले. तपासाअंती तरुणी दोन महिन्यांची गरोदर असल्याची बाब पुढे आली आहे. नागेंद्रविरोधात देवरुख पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक संग्राम पाटील करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Divyang gangrape rape