शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
2
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
3
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
4
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
5
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
6
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
7
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
8
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
9
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
10
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
11
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
12
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
13
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
14
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
15
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
16
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
17
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
18
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
19
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
20
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना

जिल्ह्याचे पालकमंत्री १२, १३ ला सिंधुदुर्गात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 17:42 IST

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे १२ व १३ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे आहे.

ठळक मुद्देजिल्ह्याचे पालकमंत्री १२, १३ ला सिंधुदुर्गातकार्यकर्ता मेळावा, कार्यकर्त्यांसमवेत संवाद

सिंधुदुर्गनगरी : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्रीउदय सामंत हे १२ व १३ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे आहे.रविवार १२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता खारेपाटण येथे आगमन व कार्यकर्त्यांसमवेत संवाद, १०.२५ वाजता खारेपाटण येथून मोटारीने वैभववाडीकडे प्रयाण, ११ वाजता वैभववाडी येथे आगमन व शिवसेना कार्यकर्ता मेळावा, दुपारी १२ वाजता वैभववाडी येथून मोटारीने कणकवलीकडे प्रयाण करणार आहेत. 

१२.४५ वाजता कणकवली येथे आगमन व शिवसेना कार्यकर्ता मेळावा, दुपारी १.३० ते २.३० दरम्यान आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी राखीव, २.३० वाजता कणकवली येथून मोटारीने देवगडकडे प्रयाण, ३.३० वाजता देवगड येथे आगमन व शिवसेना कार्यकर्ता मेळावा, सायंकाळी ४.३० वाजता देवगड येथून मोटारीने मालवणकडे प्रयाण, ५.३० वाजता मालवण येथे आगमन व शिवसेना कार्यकर्ता मेळावा, ६.३० वाजता मालवण येथून मोटारीने कुडाळकडे प्रयाण, ७.३० वाजता कुडाळ येथे आगमन व शिवसेना कार्यकर्ता मेळावा, रात्री ८.३० वाजता कार्यक्रमस्थळावरून मोटारीने एम.आय.डी.सी विश्रामगृह, कुडाळकडे प्रयाण, ९ वाजता एम.आय.डी.सी. विश्रामगृह, कुडाळ येथे आगमन व मुक्काम आहे. सोमवार १३ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता एम.आय.डी.सी विश्रामगृह, कुडाळ येथे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, १०.३० वाजता एम.आय.डी.सी. विश्रामगृह, कुडाळ येथून मोटारीने ओरोसकडे प्रयाण करणार आहेत. 

११ वाजता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग येथे ३१ वे रस्ता सुरक्षा अभियान-२०२० चे उद्घाटन समारंभास उपस्थिती, ११.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, नवीन डी.पी.डी.सी. हॉल येथे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व जिल्हास्तरीय सर्व अधिकारी यांच्या समवेत सर्व विभागांची आढावा बैठक, दुपारी १.३० ते २.३० राखीव, २.३० वाजता जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा पर्यटन अधिकारी, विभागीय व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, व संबंधित सर्व अधिकारी यांच्या समवेत चांदा ते बांदा व पर्यटन आढावा बैठक आहे. 

टॅग्स :Uday Samantउदय सामंतsindhudurgसिंधुदुर्गministerमंत्री