जिल्ह्याचे पालकमंत्री १२, १३ ला सिंधुदुर्गात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 05:42 PM2020-01-11T17:42:04+5:302020-01-11T17:42:58+5:30

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे १२ व १३ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे आहे.

District Guardian Minister 1, 2 in Sindhudurg | जिल्ह्याचे पालकमंत्री १२, १३ ला सिंधुदुर्गात

जिल्ह्याचे पालकमंत्री १२, १३ ला सिंधुदुर्गात

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्याचे पालकमंत्री १२, १३ ला सिंधुदुर्गातकार्यकर्ता मेळावा, कार्यकर्त्यांसमवेत संवाद

सिंधुदुर्गनगरी : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्रीउदय सामंत हे १२ व १३ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे आहे.

रविवार १२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता खारेपाटण येथे आगमन व कार्यकर्त्यांसमवेत संवाद, १०.२५ वाजता खारेपाटण येथून मोटारीने वैभववाडीकडे प्रयाण, ११ वाजता वैभववाडी येथे आगमन व शिवसेना कार्यकर्ता मेळावा, दुपारी १२ वाजता वैभववाडी येथून मोटारीने कणकवलीकडे प्रयाण करणार आहेत. 

१२.४५ वाजता कणकवली येथे आगमन व शिवसेना कार्यकर्ता मेळावा, दुपारी १.३० ते २.३० दरम्यान आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी राखीव, २.३० वाजता कणकवली येथून मोटारीने देवगडकडे प्रयाण, ३.३० वाजता देवगड येथे आगमन व शिवसेना कार्यकर्ता मेळावा, सायंकाळी ४.३० वाजता देवगड येथून मोटारीने मालवणकडे प्रयाण, ५.३० वाजता मालवण येथे आगमन व शिवसेना कार्यकर्ता मेळावा, ६.३० वाजता मालवण येथून मोटारीने कुडाळकडे प्रयाण, ७.३० वाजता कुडाळ येथे आगमन व शिवसेना कार्यकर्ता मेळावा, रात्री ८.३० वाजता कार्यक्रमस्थळावरून मोटारीने एम.आय.डी.सी विश्रामगृह, कुडाळकडे प्रयाण, ९ वाजता एम.आय.डी.सी. विश्रामगृह, कुडाळ येथे आगमन व मुक्काम आहे. 

सोमवार १३ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता एम.आय.डी.सी विश्रामगृह, कुडाळ येथे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, १०.३० वाजता एम.आय.डी.सी. विश्रामगृह, कुडाळ येथून मोटारीने ओरोसकडे प्रयाण करणार आहेत. 

११ वाजता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग येथे ३१ वे रस्ता सुरक्षा अभियान-२०२० चे उद्घाटन समारंभास उपस्थिती, ११.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, नवीन डी.पी.डी.सी. हॉल येथे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व जिल्हास्तरीय सर्व अधिकारी यांच्या समवेत सर्व विभागांची आढावा बैठक, दुपारी १.३० ते २.३० राखीव, २.३० वाजता जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा पर्यटन अधिकारी, विभागीय व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, व संबंधित सर्व अधिकारी यांच्या समवेत चांदा ते बांदा व पर्यटन आढावा बैठक आहे. 

Web Title: District Guardian Minister 1, 2 in Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.