शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: सावंतवाडीतील जिल्हा कारागृहाचे रूप पालटणार, तीन कोटीच्या खर्चास मान्यता

By अनंत खं.जाधव | Updated: March 25, 2024 17:13 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विकास कामांचे उद्घाटन

सावंतवाडी : सावंतवाडीतील जिल्हा कारागृहाचे रूप पालटणार असून कारागृहातील अंतर्गत सुविधा निर्माण करण्यासाठी तीन कोटीच्या खर्चाला जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी मान्यता दिली. याबाबतची बैठक काल, रविवारी येथील कारागृहात पार पडली. दरम्यान विविध विकास कामांचे उद्घाटन जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडले.यात कारागृहात प्रवेश करताना राजेशाही थाट असलेला दरवाजा, व्हिडिओ कॉलिंग, डॅशबोर्ड, व्ही सी युनिट्स या अत्याधुनिक सुविधांचा समावेश आहे. कारागृहातील बंदिवानही समाजाचाच एक भाग असल्याची जाणीव ठेवत शासनाच्या वतीने कारागृहात अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे कारागृह अधीक्षक संदीप एकशिंगे यांनी सांगितले.यावेळी कारागृहाच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याहस्ते करण्यात आले तर व्हिडिओ कॉलिंग, डॅशबोर्ड व व्हीसी युनिट्सचे उद्घाटन जिल्हा न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश एच बी गायकवाड यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ओरोस जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र २ च्या न्यायाधीश देशमुख, जिल्हा  विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव  कुरणे, सावंतवाडीचे प्रांताधिकारी हेमंत निकम, पोलीस उपअधीक्षक सध्या गावडे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता वैभव सगरे, कारागृह अधीक्षक संदीप एकशिंगे, तुरुंग अधिकारी संजय मयेकर, सुभेदार शेटे,  गवस, हवालदार सुर्वे, कर्मचारी सागर सपाटे, मोईज शेख  सोनाली आघाव, हनुमंत माने,  सिद्धी गावडे आदी कारागृह कर्मचारी उपस्थित होते. राज्य कारागृह व सुधार सेवाचे अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अभिताभ गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी जिल्हा कारागृहाच्या संपूर्ण लाकडी छताऐवजी लोखंडी पत्र्याच्या छताच्या नूतनीकरणसाठी शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली असून त्यासाठी दोन कोटी ४६ लाख ५६ हजाराचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी कारागृहाच्या मुख्य संरक्षण भिंतीची उंची वाढवणे कामासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ३९ लाख ८० हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली. तसेच कारागृहात संपूर्ण विद्युत संच मांडणी व लाईट फिटिंग, फॅन यासाठी १० लाख ४० हजार रुपये प्रशासकीय मान्यता दिली. सार्वजनिक बांधकाम खात्याबाबत मार्फत याकामाची तात्काळ पूर्तता करण्यात येणार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गjailतुरुंगcollectorजिल्हाधिकारी