शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आघाडी सरकारचा जिल्हा भाजपाच्यावतीने निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 15:46 IST

Bjp Sindhudurg : भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन करणाऱ्या महाआघाडी सरकारचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करत जाहीर निषेध नोंदविण्यात आला.

ठळक मुद्देआघाडी सरकारचा जिल्हा भाजपाच्यावतीने निषेध आमदारांचे निलंबन केल्याच्या पार्श्वभूमीवर निवेदन

ओरोस : भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन करणाऱ्या महाआघाडी सरकारचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करत जाहीर निषेध नोंदविण्यात आला.सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांची भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केल्याच्या निषेधार्थ भेट घेतली. यावेळी शासनाने केलेल्या या निलंबनाबाबत निवेदन देऊन निषेध नोंदविला.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, जिल्हा परिषद गटनेते रणजीत देसाई, मालवण पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे व रूपेश कानडे उपस्थित होते. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महावसुली आघाडी राज्य सरकारने तालिबानी पद्धतीने, लोकशाही मूल्ये पायदळी तुडवून भाजपाच्या १२ आमदारांचे एक वर्षभरासाठी निलंबन केले आहे.जनतेच्या कोणत्याही प्रश्नांना न्याय न देता, भोंगळ पद्धतीने सरकारचा कारभार चाललेला आहे. लोकशाहीत जनतेच्या मनातील राग व्यक्त करण्याचा अधिकार विरोधकांना असतो, पण लोकशाहीच्या संकेतांचे पालनही या सरकारला करता आलेले नाही. सभागृहात जनतेच्या प्रश्नांना वाचा फुटू नये, केवळ यासाठीच अशा अशोभनीय कृतीचा आधार या पळपुट्या सरकारने घेतला आहे.

या सरकारचा निषेध आम्ही या निवेदनाद्वारे करत आहोत. आमचे हे निवेदन जनतेशी कसलेच सोयरसुतक न राहिलेल्या या महाविकास आघाडीच्या सरकारपर्यंत जसेच्या तसे पोहोचवावे, अशी विनंती या निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे, यावेळी जिल्हाधिकारी यांनी सदरचे निवेदन शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. 

टॅग्स :BJPभाजपाcollectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग