शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आणिबाणी काळातील बंदीवासांना 34 जणांना 32 लाखांचे मानधन वितरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 15:09 IST

आणिबाणीच्या काळात लोकशाहीकरिता बंदीवास भोगलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या धोरणाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 34 जणांना 32 लाख 40 हजार रुपयांचे मानधन त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे.

ठळक मुद्देआणिबाणी काळातील बंदीवासांना मानधन वितरीत32 लाख 40 हजार रुपयांचे मानधन बँक खात्यात जमा

सिंधुदुर्ग  : आणिबाणीच्या काळात लोकशाहीकरिता बंदीवास भोगलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या धोरणाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 34 जणांना 32 लाख 40 हजार रुपयांचे मानधन त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाने प्राधान्याने हे धोरण राबवले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी दिली.सन 1975 ते 1977 या काळात देशात आणिबाणी लागू करण्यात आली होती. या आणिबाणीच्या काळात लोकशाहीकरिता बंदीवास भोगलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्याचे धोरण महाराष्ट्र शासन राबवत आहे. त्या अनुषंगाने आणिबाणीच्या काळात एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक 10 हजार रुपये मानधन व त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस, पतीस 5 हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला.

तसेच एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक 5 हजार रुपये व त्यांच्या पश्चात त्यांच्या पती, पत्नीस अडीच हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. मिसा अंतर्गत अटक झालेल्या व्यक्तींना मानधन मंजूर करण्याचा अधिकारी जिल्हाधिकारी यांना आहेत. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मिसा अंतर्गत अटक झालेल्या 34 व्यक्तींना मानधन वितरीत करण्यात आले आहे.

या अंतर्गत आतापर्यंत एकूण 32 लाख 40 हजार रुपयांचे मानधन संबंधित व्यक्तींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी दिली.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग