शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: गेळे कावळेसाद पॉइंटवरील जमिनीवरून वातावरण तापले, मंत्री केसरकरांना गावबंदीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 14:11 IST

जमीन आमच्या हक्काची : केसरकर यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद

सावंतवाडी : गेळे येथील कावळेसाद पॉइंटवरील जागेवरून आता ग्रामस्थ चांगलेच आक्रमक बनले असून, आमची हक्काची जागा आम्हालाच मिळाली पाहिजे. मंत्री दीपक केसरकर यांनी ही जागा शासन विकसित करणार असे म्हणून ग्रामस्थांचा अपमान केला आहे. त्यांच्याशी आता कधीच चर्चा नाही उलट ही जागा आम्हाला मिळाली नाही तर केसरकरांना गावबंदी करू, असा संतप्त इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.गेळे येथील जमीन प्रश्नावरून मंत्री केसरकर यांनी शनिवारी केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद रविवारी गेळे गावात उमटले. तसेच त्याच्या विधानाचा ग्रामस्थांनी तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी सरपंच सागर ढोकरे, नारायण गवस, मनोहर बंड, महादेव पवार, तातोबा गवस, विजय गवस आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.गेळे ग्रामस्थ म्हणाले, कावळेसाद पॉइंटनजीक असलेला १९ व २० सर्व्हे नंबरमध्ये तब्बल २३ हेक्टर जमीन आहे. मात्र या जमिनीचे गावाने एकत्रित येऊन १९९६ मध्ये वाटप केले आहे. त्यामुळे आता नव्याने वाटप करण्याची गरज नाही फक्त ज्याच्या नावावर या सर्व्हेमधील जमिनी आहेत त्याना सात- बारा देण्यात यावा या जमिनीवर शासनाचे कोणतेही आरक्षण नाही. त्यामुळे चुकीचा गैरसमज करून देऊ नये, अशी समज ग्रामस्थांनी दिली. आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुकारलेल्या आंदोलन त्यांनी उपस्थित राहणे गरजेचे होते.मात्र त्यांना साधी असून, ही विचारपूस सुद्धा केली नाही. त्यामुळे आता आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार नाही आणि आम्ही सर्व गाव म्हणून एक आहोत. त्यामुळे काही झाले तरी आम्ही आमच्या जमिनी आमच्याच ताब्यात ठेवणार आहोत. केसरकर यांनी शासनस्तरावर गावाच्या मागे न राहाता ते आपल्याला हवे तसेच करू लागले तर त्यांना गावबंदी करूच, प्रसंगी आम्ही कावळेसाद पॉईंट पर्यटनासाठी बंद करू, असा इशारा ही ग्रामस्थांनी दिला.या ठिकाणी पर्यटन प्रकल्प राबविण्यात येणार आहे, असे केसरकर सांगतात. मात्र, कावळेसाद नैसर्गिकदृष्ट्या परिपूर्ण आहे. त्याठिकाणी दिवसाकाठी हजारो पर्यटक भेट देतात. त्यामुळे वेगळ्या पर्यटन प्रकल्पाची गरज काय? आणि तसा प्रकल्प गावाला हवा असल्यास गाव प्रकल्प राबवेल तुम्ही त्यात पडू नका गावातील मुलांनी आयुष्यभर दुसऱ्याकडे मोलमजुरी करावी का? असेच केसरकर यांना वाटत असेल तर चुकीचे आहे.आम्ही स्वत: रोजगार उभारू पण या जमिनीवर केसरकर काय कुणालाच पर्यटन प्रकल्प उभारू देणार नाही, असे ही ग्रामस्थांकडून स्पष्ट करण्यात आले.

केसरकर यांच्या वक्तव्याचा गावाच्या वतीने निषेधगेळे गावातील लोक आपल्याकडे कामाला येत होते असे वक्तव्य केसरकर यांनी केले होते. याबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. ती जुनी गोष्ट आहे. ती पुन्हा उगळण्यात काहीच अर्थ नाही. आम्ही तुमच्याकडे कायम हमाली करायची का? असा सवाल करून आम्ही केसरकर यांच्या त्या वक्तव्याचा ग्रामस्थांकडून निषेध करण्यात आला. तसेच केसरकर याच्या सिनेमा गृहाचे काम गेळे ग्रामस्थांनी केले हे आम्हाला माहीत नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर