शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एसटी विभागात कोल्हापूर विरुध्द सिंधुदुर्ग कर्मचाऱ्यांमध्ये वाद, कणकवलीत पणजी-कोल्हापूर एसटी रोखली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 11:55 IST

एक तास पणजी-कोल्हापूर एसटी बस रोखून धरली

कणकवली : सिंधुदुर्ग विभागातील एसटीची बस कोल्हापूरात गेल्यावर त्या बस चालकाला दुय्यमपणाची वागणूक दिली जाते. बुधवारी एका वाहकाकडून मोबाईल व तिकिटाचे टिव्हीएम मशीन कोल्हापूर आगार व्यवस्थापकानी काढून घेतले.त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी कोल्हापूर एसटी आगार व्यवस्थापकांविरोधात संताप व्यक्त करत कणकवली बसस्थानकात एक तास पणजी कोल्हापूर एसटी बस रोखून धरली होती. त्यामुळे एसटी विभागातील कोल्हापूर विरुध्द सिंधुदुर्ग कर्मचाऱ्यांमधील वाद समोर आला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी बस कोल्हापूर येथे गेल्यानंतर त्यांच्या वाहन चालक व वाहकाना दुय्यम वागणूक मिळते.त्या ठिकाणी बसमध्ये प्रवाशी भरण्यास दिले जात नाहीत.तसेच त्यांची मोबाईल व तिकीटची टिव्हीएम मशीन काढून घेतली जातात. त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यानी कणकवलीत एसटी बस रोखून धरली. त्यामुळे काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला होता.जोपर्यंत आगार व्यवस्थापक येत नाही तोपर्यंत बस सोडली जाणार नाही, असा इशारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला होता. एसटी कर्मचारी कोअर कमिटी अध्यक्ष अंनत रावले,सचिव रोशन तेंडुलकर, गणेश शिरकर आदींसह अनेक कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkolhapurकोल्हापूर