शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

महायुतीचे सरकार घालवा, महाराष्ट्राला कर्जातून वाचवा; जयंत पाटील यांचे आवाहन

By अनंत खं.जाधव | Updated: October 5, 2024 16:46 IST

'..नाहीतर कर्जाचा आकडा नऊ लाख कोटी पर्यत जाईल'

सावंतवाडी : महाराष्ट्रात निवडणूका डोळ्यांसमोर ठेवून नवनवीन योजना आणल्या जात आहेत. पण योजना पूर्ण करायला यांच्याकडे पैसे नसल्यानेच आता रिझर्व्ह बँकेकडे सव्वा लाख कोटीचे कर्ज मागितले आहे. त्यामुळेच निवडणूका लवकर लागल्या पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रावर नऊ लाख कोटीचे कर्ज होईल आणि ते आपणास परवडणारे नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार घालवा आणि सर्वसामान्यांचे सरकार आणा असे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.शिवस्वराज्य यात्रेनिमित्त आज, शनिवारी शरदचंद्र गटाची जाहीर सभा सावंतवाडीतील गांधी चौकात पार पडली. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, युवक अध्यक्ष सुनिल गव्हाणे, प्रविण भोसले, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, कोकण महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, पुंडलिक दळवी, प्रसाद रेगे, अनंत पिळणकर, सायली दुभाषी,  देवेंद्र टेमकर आदी उपस्थित होते.बहीण सुरक्षित राहिली तरच योजना चालणार जयंत पाटील म्हणाले, आतापर्यंतच्या इतिहासात सध्या सुरू असलेला भष्ट्राचार जनतेने कधीच पाहिला नव्हता. हे इव्हेंटचे सरकार झाले आहे. या राज्यात महिला सुरक्षित नाही आणि लाडकी बहीण योजना आणली. बहीण सुरक्षित राहिली तरच योजना चालणार पण सांगणार कोण? फक्त राज्यावर कर्जाचा डोंगर उभा राहात आहे. आता नव्या योजनासाठी सव्वा लाख कोटीचे कर्ज मागितले आहे. त्यामुळे निवडणुका लवकर झाल्या पाहिजेत. कर्ज घ्याचे तरी बंद करतील नाहीतर राज्यावर नऊ लाख कोटीचे कर्ज होईल अशी भिती पाटील यांनी व्यक्त केली.'पंधरा वर्षापूर्वीच्या घोषणा आजही पूर्ण झाल्या नाहीत'पाटील यांनी यावेळी केसरकर यांच्यावर जोरदार टिका केली. दिवाळी आली तरी गणवेश नाही. यांना आता फक्त लाडका काॅन्ट्रकटर हवा आहे. पण मुलांचे गणवेश नको. मतदारसंघात पंधरा वर्षापूर्वी ज्या घोषणा केल्या त्या आज ही पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळेच नवो आमदार हवो असे म्हणत केसरकर यांची खिल्ली उडवली.गव्हाणे यांनी तर आपल्या तडाखेबाज भाषणातून सरकार वर जोरदार हल्ला चढवला आणि राज्यात बदल घडवलाच तरच हा महाराष्ट्र स्वाभिमानाने जगेल अन्यथा हे गद्दार आपला स्वाभिमान महाराष्ट्रा समोर गहाण ठेवतील अशी भिती व्यक्त केली. तर अर्चना घारे-परब यांनी जाणीव जागर यात्रेतून मला जनतेच्या समस्या कळल्या. आता या समस्या सोडवण्याची वेळ आली आहे. त्यासाठी तुमचा आशिर्वाद हवा असे आवाहन केले. माजी मंत्री भोसले यांनी केसरकर यांनी फक्त घोषणा केली पुढे काय झाले ते त्यांनाच माहिती अशा शब्दात टिका केली. अमित सामंत, सुरेश दळवी यांनी मनोगते व्यक्त केली. तसेच सुरेश दळवीच्या पुस्तकाचे प्रकाशन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडीJayant Patilजयंत पाटीलMahayutiमहायुती