शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कलमठातील युवकाकडून युवतीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 12:02 IST

कणकवली तालुक्यातील एका युवतीच्या विनयभंगाची घटना २ जानेवारी रोजी घडली आहे. पीडित युवतीचा गैरफायदा घेऊन संशयित आरोपी अमोल साटम (रा. कलमठ-बिडयेवाडी) याने एकदंत अपार्टमेंटमध्ये अतिप्रसंग करीत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात विविध कलमांनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देकलमठातील युवकाकडून युवतीचा विनयभंगगुन्हा दाखल : युवती रुग्णालयात दाखल

कणकवली : कणकवली तालुक्यातील एका युवतीच्या विनयभंगाची घटना २ जानेवारी रोजी घडली आहे. पीडित युवतीचा गैरफायदा घेऊन संशयित आरोपी अमोल साटम (रा. कलमठ-बिडयेवाडी) याने एकदंत अपार्टमेंटमध्ये अतिप्रसंग करीत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात विविध कलमांनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.संशयित आरोपी अमोल साटम याने संबंधित पीडित युवतीचे व्हॉट्सअ‍ॅप हॅक केले होते. याबाबत पीडित युवतीने अमोल साटम याच्याकडे विचारणा केली. त्यावेळी त्याने कलमठ बिडयेवाडी येथील एकदंत अपार्टमेंटमध्ये तिला बोलावले. त्याठिकाणी पीडित युवती पोहोचल्यावर समोरून कोणीतही तुझ्याकडे बघत आहे का? असे विचारत तिला तळमजल्यावरील फ्लॅटमध्ये यायला सांगितले. तिथे पोहोचल्यावर आरोपीने फ्लॅटचा दरवाजा उघडून तिला आत यायला सांगितले. त्यानंतर पीडित युवतीने एकटीच आत येण्यास नकार दिला. त्यावेळी आरोपीने जबरदस्तीने ओढत तिला फ्लॅटमध्ये नेले.तसेच तू मला आवडतेस. तुझ्याशी मला लग्न करायचे आहे. असे सांगितले. यावर पीडितेने त्याला तुझे लग्न झालेले आहे. तुला मुलगाही आहे, असे सांगून लग्नास नकार दिला. तसेच मला आता जाऊदे माझी आई वाट बघते आहे असे सांगितले. तेव्हा संशयिताने तिला पकडून लगट करीत मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच त्याने त्या फ्लॅटच्या बेडरुममध्ये नेवून तिचा विनयभंग केला.यादरम्यान पीडित युवती आणि आरोपीत वादावादी झाली. आरोपीने तिला तेथे असलेल्या आॅईलच्या कॅनने मारहाण केली. तसेच हाताच्या थापटाने मारत शिवीगाळ केली. या मारहाणीतून सुटका करीत पीडित युवती बाथरुममध्ये गेली. दरवाजा बंद करीत त्याच अपार्टमेंटमधील मैत्रिणीला मदतीसाठी फोन करण्याचा प्रयत्न केला. मैत्रिणीचा फोन लागला नाही. त्यावेळी आरोपीने जोरजोरात बाथरुमचा दरवाजा ठोठावला. आपण बाथरुमच्या बाहेर गेलो तर आरोपी आपल्याला ठार मारेल या भितीने तिने गुडनाईटचे लिक्वीड प्राशन करून बाथरुमचा दरवाजा उघडला. पीडितीने गुडनाईट लिक्वीड प्राशन केल्याचे लक्षात येताच तिच्या हातातील मोबाईल काढून घेऊन तो भिंतीवर आपटला.त्या दोघांतील वादानंतर पीडितेने घडलेली कहानी आईच्या कानावर घातली. त्यानंतर ताबडतोब नातेवाईकांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी तिला दाखल केले. ही घटना गुरुवारी कलमठ येथे घडली. उपचारादरम्यान प्रकृती खालावल्याने युवतीला जिल्हा रुग्णालयात हलविले. पीडित युवतीच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. तिने दिलेल्या तक्रारीनुसार संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग