शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: लाखोचा गंडा घालणाऱ्या संकल्प फायनान्सच्या संचालकांना मारहाण, सावंतवाडीतील घटना

By अनंत खं.जाधव | Updated: February 29, 2024 16:12 IST

ग्राहक संतप्त: पोलिसांकडून हस्तक्षेप : संचालक पोलिसांच्या ताब्यात 

सावंतवाडी : कमी व्याजदराने पैसे देतो असे सांगून अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या संकल्प फायनान्सच्या संचालकांना गुरूवारी संतप्त झालेल्या ग्राहकांनी मारहाण केली.त्यानंतर त्या ठिकाणी दाखल झालेल्या पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले. यावेळी संतप्त ग्राहकांनी पोलिसांची गाडी रोखून धरली. जोपर्यंत आम्हाला आमचे पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही गाडी जाऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. तर याबाबत पोलीस ठाण्यात संबंधितावर गुन्हे दाखल करू, अशी भूमिका पोलिसांनी घेतल्यानंतर आंदोलक थोडे शांत झाले मात्र उशिरापर्यंत रास्ता रोको सुरू होता. सावंतवाडी-सालईवाडा भागात नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या संकल्प  फायनान्स कंपनीकडून कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देतो, असे सांगून अनेकांना गंडा घालण्यात आला होता. त्यानंतर कंपनीच्या काही अधिकाऱ्यांनी आपण  ते पैसे परत करतो, असे सांगितले होते. त्यानुसार पैसे परत मिळण्यासाठी आज ग्राहक जमले होते. मात्र पैसे देण्यास  कंपनीचे अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शविली ठरल्या प्रमाणे पैसे न देण्यात आल्याने संतप्त ग्राहकांचा पारा चढला. यावेळी त्यांना मारहाण करण्यात आली. तसेच शहरात धिड काढण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु त्याचवेळी त्याठिकाणी दाखल झालेल्या पोलिसांनी हस्तक्षेप केला व त्या दोघांना ताब्यात घेत ग्राहकांना शांत  केले.परंतु त्यांना गाडीत बसल्यानंतर तक्रार नाही मग तुम्ही त्यांना ताब्यात का घेता, असा जाब विचारत आमचे पैसे परत देणार कोण? असा सवाल करत संतप्त ग्राहकांनी पोलिसांच्या गाडी समोर ठिय्या मांडला.हा प्रकार बराच उशिर सुरू होता.नागरिकांनी ही मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती.जो पर्यत आमचा निर्णय होत नाही तोपर्यंत जाऊ देणार नाही असा पवित्रा ग्राहकांकडून घेण्यात आला अखेर पोलिसांनी ग्राहकांनी तक्रार दिल्यानंतर त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असे स्पष्ट केले. त्यानंतर तेथून पोलिस जाण्यास निघाले पण काहि ग्राहकांचे समाधान होत नसल्याने उशिरापर्यंत ते तेथेच ठिय्या मांडला होता. दरम्यान या संकल्प फायनान्स च्या वतीने कार्यालय थाटल्या नंतर अनेक राजकीय पक्षांकडून आक्षेप घेण्यात आले होते.तसेच कंपनी विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती.पण या तक्रारीची दखल पोलिसांकडून घेण्यात आली नव्हती.त्या काळात अनेक ग्राहकांनी पैसे भरले होते.त्यानंतर मागील पंधरा दिवसांपासून यातील काहि संचालक कर्मचाऱ्यांवर ऑफिसची जबाबदारी देऊन गायब झाले होते. ते आज सावंतवाडीत दखल झाल्यानंतर ग्राहकांकडून त्यांना चांगलाच धडा शिकवला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस