शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

सिंधुदुर्गात दिपोत्सवाला उत्साहात प्रारंभ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 17:43 IST

diwali, kankavli, sindhudurgnews मनमोहक पणत्या, तोरण, आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांच्या माळा आणि नयनरम्य अशी आरास कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी दिसून येत आहे. दिपोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे.मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रमांवर अनेक बंधने आहेत .

ठळक मुद्देसिंधुदुर्गात दिपोत्सवाला उत्साहात प्रारंभ !आकर्षक रोषणाई ; सांस्कृतिक कार्यक्रमांवर मात्र बंधने

सुधीर राणे

कणकवली : मनमोहक पणत्या, तोरण, आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांच्या माळा आणि नयनरम्य अशी आरास कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी दिसून येत आहे. दिपोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे.मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रमांवर अनेक बंधने आहेत .सर्वात मोठा सण असलेल्या दीपोत्सव पर्वास सुरुवात झाली असून, संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा रंगीबेरंगी प्रकाशात उजळून निघाला आहे. धनत्रयोदशी, नरकचर्तुदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज असे दीपावलीतील एकेक सण दररोज साजरे करण्यासाठी घरोघरी तयारीही पूर्ण झाली आहे. तर अनेक ठिकाणी बच्चे कंपनी किल्ला बनविण्यात गर्क झाली असल्याचे दिसून येत आहे.दिवाळी हा सर्वात मोठा सण आहे.या उत्सवाचे वेध महिनाभर अगोदरपासूनच लागलेले असतात. फराळ, कपडे, धार्मिक विधी अशा अनेक कामांची घाई झालेली असते. त्यासाठी विविध प्रकारची खरेदी केली जाते. मात्र, वाढत्या महागाईमुळे ग्राहकाना खरेदी करताना हात आखड़ता घ्यावा लागत आहे.सर्व बाजारपेठा दीवाळीसाठी लागणाऱ्या साहित्याने सजल्या आहेत. गृहोपयोगी वस्तू, कपडे, फळे, फुले अशी विविध प्रकारची खरेदी सहकुटुंब केली जात असल्याचे सध्या दिसत आहे.नरकचतुर्दशी शनिवारी साजरी करण्यात आली. सुर्योदयापूर्वी अनेक ठिकाणी नरकासुराच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच एकमेकांना फराळाचे निमंत्रण देवून करंज्या, लाडू, चकली , चिवड़ा अशा फरळाचा आस्वाद घेण्यात आला. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी अनेकांकडून काळजी घेण्यात येत होती.शनिवारी सायंकाळी लक्ष्मीपूजन करण्यात आले. त्यासाठी शुक्रवारीच तयारी करण्यात आली होती. तसेच अनेक नागरिकांनी दीवाळी पाडवा आणि भाऊबीजसाठी मोठया प्रमाणात खरेदी केली . दीपोत्सवानिमित्त घरोघरी दीप उजळले आहेत. विद्युत माळांमुळे रोषणाईत भर पडली आहे. वर्षभरातील थकवा दूर सारून आता सारे जणच दिवाळीचा आनंद लुटण्यासाठी सज्ज झाले आहेत. ग्रामीण भागात काही ठिकाणी भात कापणीची लगबग सुरु आहे.सांस्कृतिक कार्यक्रमांना मर्यादा !दीपोत्सवानिमित अनेक संस्था व मंडळे दरवर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात .मात्र, यावर्षी कोरोना मुळे या सर्व कार्यक्रमांवर मर्यादा आल्या आहेत. 

टॅग्स :Diwaliदिवाळीsindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली