शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

दिलीप नार्वेकरांची प्रतिष्ठा पणाला

By admin | Updated: November 14, 2016 21:46 IST

सावंतवाडी न. प. प्रभाग तीन : दोन जागांसाठी सात उमेदवार रिंगणात

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिकेचा प्रभाग क्रमांक ३ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. या बालेकिल्ल्यात दीपक केसरकरांच्या ‘एंट्री’ने मागच्या निवडणुकीत काँग्रेसला जोरदार धक्का दिला होता. मात्र, यावेळी काँग्रेसची या प्रभागात प्रतिष्ठा पणाला लागली असून, माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर यांचा मुलगा राघवेंद्र नार्वेकर या प्रभागातून निवडणूक लढवित असल्याने त्यांच्या विजयासाठी जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यामुळे या प्रभागावर सावंतवाडीवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. या प्रभागातून दोन जागांसाठी सात उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.सावंतवाडी नगरपालिका क्षेत्रातील प्रभाग ३ मध्ये वैश्यवाडा, भटवाडीचा काही भाग, चितारआळी, पांजरवाडा असा भाग येतो. या प्रभागातून भाजपकडून तृप्ती शंकरदास व आनंद नेवगी, शिवसेनेतून शुभांगी सुकी व सुरेश भोगटे, तर काँग्रेसकडून शर्वरी मडगावकर व राघवेंद्र नार्वेकर हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजू पनवेलकर यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने या मतदारसंघात चुरस निर्माण झाली असून, सध्या तरी कोणाला मतदार कौल देतील, हे सांगता येणार नाही.कारण शिवसेनेने विद्यमान नगरसेविका शुभांगी सुकी यांच्यासह माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांना या प्रभागातून उमेदवारी दिली आहे. वैश्यवाडा येथे सुकी यांचा चांगला प्रभाव आहे, तर चितारआळी भागात सुरेश भोगटे यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यातच पाच वर्षांपूर्वी शुभांगी सुकी या मोठ्या मताधिक्क्याने या प्रभागातून निवडून आल्या होत्या. प्रभागात प्रत्येक घरापर्यंत त्यांचा संपर्क आहे. त्याचा फायदा त्यांना होणार आहे.भाजपने आनंद नेवगी यांना उमेदवारी देऊन सेना व काँग्रेसला चांगलाच धक्का दिला आहे. नेवगी यांनी या प्रभागात चांगले काम केले आहे. त्याशिवाय त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे. त्यांच्या जोडीला चितारआळीतून तृप्ती शंकरदास यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना व भाजपचे उमेदवार या प्रभागातून जोरदार मेहनत घेत असून, काँग्रेसची मात्र या प्रभागात प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रभाग ३ हा पूर्वीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. चितारआळीमध्ये बरीच वर्षे अ‍ॅड. दिलीप नार्वेकर यांचे वास्तव्य होते. तेथूनच त्यांनी अनेक वर्षे नगरसेवक व नगराध्यक्षपद भूषविले आहे. मागील निवडणुकीत त्यांचा काही मतांनी पराभव झाला होता. यावेळी ते स्वत: निवडणूक रिंगणात नसले तरी त्यांचा मुलगा निवडणूक लढवित आहे. मात्र, मुलासाठी अ‍ॅड. दिलीप नार्वेकर यांची प्रतिष्ठा चांगलीच पणाला लागली आहे. संपूर्ण सावंतवाडीचे लक्ष या प्रभागावर लागून राहिले आहे.काँग्रेसला या प्रभागात खरा अडसर आहे तो अपक्ष उमेदवार राजू पनवलेकर यांचा. त्यांनी या प्रभागात गेल्या पाच वर्षांपासून काम केले आहे. मात्र, आयत्यावेळी त्यांना डावलल्याने त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यातच पनवेलकर यांचे याच प्रभागात वास्तव्य असल्याने त्याचाही फटका काँग्रेसला बसू शकतो. त्यामुळे काँग्रेसला या प्रभागाकडे अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. (प्रतिनिधी)