शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीक्षितकुमार गेडाम यांचे आॅल आऊट आॅपरेशन, अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 17:51 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढलेल्या घरफोडीच्या धर्तीवर जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्यात राबविलेल्या आॅल आऊट आॅपरेशनमध्ये ३७ महत्त्वाच्या ठिकाणचे २४ लॉज तपासण्यात आले. यात ७४२ जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. तसेच ८ जणांना समन्स तर एकाला वॉरंट बजावण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी दिली.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यातील २४ लॉजची तपासणी; ७४२ जणांवर कारवाई सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीक्षितकुमार गेडाम यांचे आॅल आऊट आॅपरेशन अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात वाढलेल्या घरफोडीच्या धर्तीवर जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्यात राबविलेल्या आॅल आऊट आॅपरेशनमध्ये ३७ महत्त्वाच्या ठिकाणचे २४ लॉज तपासण्यात आले. यात ७४२ जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. तसेच ८ जणांना समन्स तर एकाला वॉरंट बजावण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या नेतृत्वाखालील या पोलिसी कारवाईमुळे अवैध आणि गुन्हेगारी गोटात खळबळ उडाली आहे.जिल्ह्यात जेव्हा पोलीस दलाकडून अवैध धंद्यांविरोधात कठोर पाऊल उचलले जाते त्याचवेळी घरफोड्या, चोऱ्या अशा भुरट्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी याची त्वरित दखल घेत या गुन्हेगारी जगताच्या विरोधात कारवाईचे फास आणखी घट्ट केले.

रविवारी रात्री ते सोमवारी पहाटेपर्यंत पोलीस दलाचे हे छापासत्र जिल्हाभर सुरू राहिले आणि जिल्ह्यातील या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या जगतावर पोलिसांची कारवाई सुरू झाली.जिल्ह्यातील ३७ संवेदनशील ठिकाणची २४ हॉटेल्स, लॉज, सरप्राईज चेकिंग काही तपासणी नाके या ठिकाणी छापा टाकला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकाचवेळी मोठी कारवाई प्रथमच झाली असून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले अनेक संशयित आरोपी पोलिसांच्या हाती लागले आहेत.

पोलिसांनी ७०५ संशयित ताब्यात घेतले असून यात ३६ वाहनेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. यापूर्वीच्या काही गुन्ह्यांत पोलिसांना हवे असलेले १२ संशयित आरोपी पोलिसांना मिळाले आहेत. तर ८ सराईत आरोपी आणि १६ मोस्ट वाँटेड संशयित आरोपी पोलिसांच्या हाती लागले आहेत.या आॅल आऊट आॅपरेशनमध्ये एकूण ७४२ जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. तसेच ८ जणांना समन्स तर एकाला वॉरंट बजावण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी दिली. या कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली नाही.चोरी, घरफोडी, संशयित आरोपी किंवा गुन्ह्यांची माहिती तसेच अवैध धंद्यांविषयीची माहिती सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस दलाच्या नियंत्रण कक्षाच्या ०२३६२-२२८२०० या क्रमांकावर संपर्क साधून द्यावी असे आवाहनही जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी केले आहे.परप्रांतीयांची माहिती गोळा करापोलिसांच्या या धडक मोहिमेत २१ अधिकारी व ८२ पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्ग रुंदीकरणाचे काम विविध बांधकामांच्या साईट्सवर सुरू आहे. या कामात अनेक परप्रांतीय कामगार दाखल झाले आहेत. त्यांचे नाव, पत्ते, संपर्क नंबर, ओळख याबाबतची माहिती स्थानिक पोलिसांनी गोळा करावी, असे आदेशही जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी दिले आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस