शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

दिगवळे-रांजणवाडी धरण प्रकल्पाचे सर्वेक्षण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 11:22 IST

Dam Vinayak Raut sindhudurg - दिगवळे-रांजणवाडी येथे धरण प्रकल्प व्हावा, अशी ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी आहे. या धरण प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी आवश्यक तो निधी विशेष बाब म्हणून देण्यात येणार आहे. तसेच प्रकल्पाचे सर्वेक्षणही तातडीने करण्यात येणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.

ठळक मुद्देदिगवळे-रांजणवाडी धरण प्रकल्पाचे सर्वेक्षण करणार विशेष बाब म्हणून निधी देण्याचा प्रयत्न :विनायक राऊत

कणकवली : सह्याद्रीच्या पायथ्याशी लघुपाटबंधारे प्रकल्प झाल्यास सिंचनाचे क्षेत्र वाढण्याबरोबरच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही सुटणार आहे. दिगवळे-रांजणवाडी येथे धरण प्रकल्प व्हावा, अशी ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी आहे. या धरण प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी आवश्यक तो निधी विशेष बाब म्हणून देण्यात येणार आहे. तसेच प्रकल्पाचे सर्वेक्षणही तातडीने करण्यात येणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.खासदार राऊत यांनी कणकवली तालुक्यातील दिगवळे, नाटळ, दारिस्ते, शिवडाव, गांधीनगर या गावांचा दौरा केला. शिवडाव येथील गडनदीवरील बंधार्‍याच्या कामाची पाहणी केल्यानंतर दारिस्ते ग्रामपंचायतीला भेट देत कुडाळ तालुक्यातील घोडगे-कडावल मार्गाला जोडणार्‍या रस्त्याची पाहणी केली.त्यानंतर दिगवळे-रांजणवाडीला भेट देत हळदीचा माळ येथे ग्रामस्थांकडून मागणी होत असलेल्या धरण प्रकल्पाच्या जागेची पाहणी केली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळा भिसे, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, विभागप्रमुख आनंद आचरेकर, युवा सेना तालुका समन्वयक गुरूनाथ पेडणेकर, कुंभवडे सरपंच आप्पा तावडे, हेमंत सावंत, शामसुंदर परब आदी उपस्थित होते.यावेळी शामसुंदर जाधव, माजी सरपंच दीपक मेस्त्री, भाई वाळवे, पांडुरंग माने, शशिकांत रेवडेकर, मनोहर माने आदी उपस्थित होते. रांजणवाडी या दुर्गम भागातील विविध समस्यांची माहिती मधुकर जाधव यांनी राऊत यांना दिली. येत्या काही दिवसांत धरण प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी ग्रामस्थांकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे सांगण्यात आले.सर्वेक्षणासाठी आवश्यक निधी शासनाकडून देणारदिगवळे-रांजणवाडी येथे चंद्रकांत कोठावळे यांच्या घरी झालेल्या बैठकीत लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता देव शेट्टी यांच्याशी धरण प्रकल्पाच्या तांत्रिक बाजूविषयी चर्चा केली. तांत्रिकदृष्ट्या प्रकल्पासाठी जागा योग्य असल्याचे देव शेट्टी यांनी सांगितल्यानंतर प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी आवश्यक निधी शासनाकडून दिला जाईल, असे खासदार राऊत यांनी सांगितले. 

टॅग्स :DamधरणVinayak Rautविनायक राऊत sindhudurgसिंधुदुर्ग