मतभेद संपले; आघाडी म्हणूनच लढणार

By Admin | Updated: September 14, 2014 23:56 IST2014-09-14T22:26:25+5:302014-09-14T23:56:45+5:30

कुडाळ येथील बैठकीत राष्ट्रवादी-काँग्रेसचा निर्णय

The differences ended; The fight will be the only reason | मतभेद संपले; आघाडी म्हणूनच लढणार

मतभेद संपले; आघाडी म्हणूनच लढणार

कुडाळ : राजन तेलींना राष्ट्रवादी पक्षात घेतल्यास आघाडीची बिघाडी होईल व सावंतवाडी मतदारसंघात आम्ही आघाडीचे काम करणार नाही, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी कुडाळ येथे सांगितले. तसेच आमच्या दोन्ही पक्षातील मतभेद संपले असून भविष्यातील सर्व निवडणुका या आघाडी म्हणूनच लढू, असे वक्त व्य राष्ट्रवादीचे पुष्पसेन सावंत यांनी कुडाळ येथील राष्ट्रवादी व काँग्रेसच्या बैठकीत केले.
राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे नेते व पदाधिकारी यांनी कुडाळ येथे बैठक आयोजित केली होती. या बैठकीला मत्स्योद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पुष्पसेन सावंत, काँग्रेसचे प्रांतिक सदस्य व युवा नेते नीतेश राणे, काँगे्रस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष नंदूशेठ घाटे, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दादा बेळणेकर, काँगे्रस तालुकाध्यक्ष प्रकाश मोर्ये, अमित सामंत, संजय पडते, रणजीत देसाई, विनायक राणे, सुनील भोगटे, विकास कुडाळकर, भास्कर परब व दोन्ही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)

प्रामाणिकपणे काम करा
या बैठकीत आम्ही आघाडी करण्याचे ठरविले असून दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्याने एकमेकांवर कुरघोडी न करता प्रामाणिकपणे एकत्र काम करा, असे मत नीतेश राणे यांनी व्यक्त केले.
राजन तेलींना घेतल्यास बिघाडी : सावंत
यापुढे दोन्ही पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते पक्षबदल करीत असल्यास आम्ही यापुढे चर्चा करणार. मात्र, राष्ट्रवादी पक्षाने राजन तेलींना पक्षात घेतल्यास आघाडीमध्ये बिघाडी होऊन सावंतवाडी मतदार संघाचे आम्ही काम करणार नाही, असा इशारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दिला. (प्रतिनिधी)

Web Title: The differences ended; The fight will be the only reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.