जिल्ह्यात १४८ बालकांना अतिसार

By Admin | Updated: August 13, 2014 23:56 IST2014-08-13T23:56:09+5:302014-08-13T23:56:09+5:30

नियंत्रण सप्ताह सर्वेक्षण कार्यक्रमात माहिती उघड

Diarrhea in 148 children in the district | जिल्ह्यात १४८ बालकांना अतिसार

जिल्ह्यात १४८ बालकांना अतिसार

पदाधिकाऱ्यांची भेट : अधिकाऱ्यांकडून दखल
देवरी : सडक अर्जुनी येथील एस.चंद्रा पब्लिक स्कुलच्या व्यवस्थापनाच्या विरोधात या शाळेत शिकणाऱ्या ५० विद्यार्थ्यांच्या पालकांनी ५ आॅगस्टपासून आमरण उपोषण सुरू केले होते. त्यातील पाच पालकांची प्रकृती खालवल्याने रूग्णालयात मंगळवारी रुग्णालयात भरती करण्यात आले. ही बातमी बुधवारच्या लोकमतमध्ये झळकताच शासनाचे अधिकारी व पदाधिकारी जागृत झाले. त्यांनी उपोषणकर्त्याची मागणी पूर्ण करीत असल्याचे सांगितल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले.
एस. चंद्रा पब्लिक स्कुल या शाळेत जर सर्व सोयी सुविधा नसतील तर त्या शाळेला दिलेली मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया शासनाने त्वरीत करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. पालकांची मागणी रास्त स्वरूपाची असून ते आठवड्यापासुन आमरण उपोषणावर बसले आहेत. या बाबत आपण कोणती कारवाई केली असे विचारले असता देवरीचे प्रकल्प अधिकारी गिरीश सरोदे यांनी सांगितले की आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त डॉ.पल्लवी दराडे यांनी या संबंधात तातडीने फॅक्स पाठविला आहे. या फॅक्स संदेशमध्ये एस.चंद्रा पब्लिक स्कुल सडक अर्जुनी या शाळेविरूद्ध तक्रारी आणि आपले ६ आॅगस्ट, ११ आॅगस्ट, १२ आॅगस्ट रोजीचे पत्र तसेच १३ आॅगस्ट रोजीच्या दुरध्वनी संदेशाच्या अनुषंगाने जे पालक सदर शाळेत आपल्या पाल्यांना शिकविण्यास इच्छुक नाहीत अशा तिसरी, दुसरीतील ३५ आणि तिसरीतील १५ अशा ५० विद्यार्थ्यांना प्रकल्प अधिकारी चिमुर यांच्या प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या देवयानी इंटरनॅशनल स्कुल सिंदेवाही या शाळेत समायोजित करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पालकांची प्रमुख मागणी होती ती पूर्ण झाल्याने त्यांनी हे उपोषण मागे घ्यावे अशी मागणी केली. यावरुन उपोषणावर बसलेले पालक आपले उपोषण मागे घेण्यात तयार झाले. देवरीचे प्रकल्प अधिकारी गिरीश सरोदे यांनी या सर्व उपोषणकर्त्यांना निंबूपाणी पाजुन या उपोषणाची सांगता झाली.
बुधवारी मोरगाव अर्जुनीचे आ.राजकुमार बडोले, आदिवासी विकास विभागाचे संचालक भरतसिंह दुधनाग, जि.प.सदस्य राजेश चांदेवार, भाजप नेते झामसिंग येरणे, भाजप आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संपत पुराम यांनी उपोषणकर्त्याची भेट देऊन त्यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा यानंतर आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा झाली.

Web Title: Diarrhea in 148 children in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.