देवरुखात बालचित्रपट महोत्सव
By Admin | Updated: February 13, 2015 00:53 IST2015-02-12T23:48:58+5:302015-02-13T00:53:39+5:30
आॅडियन्स बेस्ट फिल्म पुरस्कार मिळवलेला जगप्रसिद्ध दिग्दर्शक माजिद माजिदी यांचा गरीब कुटुंबातील बहिण-भावांचे नाते, एकमेकांवरचे प्रेम उलगडून दाखवणारा एक भावस्पर्शी चित्रपट

देवरुखात बालचित्रपट महोत्सव
देवरुख : फिल्म सोसायटी, निपाणी आणि देवरुखच्या स्नेह परिवारातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी दि. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत माटे - भोजने सभागृहात बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.लहान वयात पाहायला, ऐकायला, मिळालेल्या चांगल्या, निखळ आनंद देणाऱ्या गोष्टी पुढच्या पूर्ण आयुष्यावर परिणाम करणाऱ्या, ठसा उमटवणाऱ्या ठरतात. माणसाचा चांगूलपणावरील विश्वास वाढवणाऱ्या ठरतात म्हणून असे उद्बोधक चांगले चित्रपट स्नेह परिवार शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहे. एकाच तिकिटात दोन चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. यामध्ये चिल्ड्रेन आॅफ हेवन हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. आॅडियन्स बेस्ट फिल्म पुरस्कार मिळवलेला जगप्रसिद्ध दिग्दर्शक माजिद माजिदी यांचा एका गरीब कुटुंबातील बहिण-भावांचे नाते, एकमेकांवरचे प्रेम उलगडून दाखवणारा एक अस्वस्थ करणारा भावस्पर्शी चित्रपट खास आकर्षण आहे, तर दुसरा चित्रपट द ब्लॅक स्टॅलियन हा चित्रपट एक लहान मुलगा आणि त्याची घोड्याशी असलेली दोस्ती या कथानकावर आधारित चित्रपट दाखवला जाणार आहे.
दोन्ही चित्रपटांच्या प्रवेशिकांसाठी व अधिक माहितीसाठी स्नेह परिवार आणि रुबिना चव्हाण, युयुत्सू आर्ते, प्रमोद हर्डीकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांना सहज कळतील, असे संस्कारक्षम बालचित्रपट मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी शाळा, शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही स्नेह परिवाराने केले आहे. (प्रतिनिधी)