माडखोलमध्ये भक्तिमय वातावरण
By Admin | Updated: November 24, 2014 23:08 IST2014-11-24T22:09:29+5:302014-11-24T23:08:56+5:30
अवधुतानंद महाराज पुण्यतिथी : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल

माडखोलमध्ये भक्तिमय वातावरण
सावंतवाडी : माडखोल येथील श्री सद्गुरू समर्थ अवधुतानंद महाराजांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गेले सात दिवस हा कार्यक्रम सुरू असून या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविक माडखोल येथे दाखल झाले होते. या सोहळ्यानिमित्ताने माडखोल परिसरात सात दिवस भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
श्री सद्गुरू समर्थ अवधुतानंद महाराज पुण्यतिथी व नाम संकीर्तन सप्ताह १६ नोव्हेंबरपासून सुरू झाला. तर या कार्यक्रमाची समाप्ती २४ नोव्हेंबरला झाली.
या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक माडखोल येथे आले होते. या कार्यक्रमानिमित्त संपूर्ण माडखोल परिसर ‘अवधुतानंदमय’ होऊन गेले होते.या कार्यक्रमाचे आयोजन सदगुरू अवधुतानंद महाराज सेवा मंडळाच्यावतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रशांत मिठबांवकर, विजय घाग, आर. एन. पालव, चारुहास तावडे, जर्नादन जठार आदी सहभागी झाले होते. यावेळी दत्तयागाचे आयोजनही करण्यात आले होते. तसेच लक्ष्मीनारायण व सद्गुरू पादुका पूजन, श्री गुरूंच्या समाधीस अभ्यंगस्नान व पूजन, मध्यान्ह आरती, पालखी परिक्रमा आदी कार्यक्रम भक्तिभावाने पार पडले. सात दिवसांच्या या उत्सवासाठी माडखोल येथील अवधुतानंद महाराज मठाच्या परिसरात हजारो भाविक येतात. त्यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे. (प्रतिनिधी)