शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

देवगड हापूस आंबा : रोज ५ हजार पेट्या वाशी मार्केटला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 11:28 IST

देवगड तालुक्यामधून देवगड हापूस आंब्याच्या सुमारे ५ हजार पेट्या दररोज वाशी मार्केटला रवाना होत आहेत. अचानक उष्णता वाढल्याने आंबा लवकर तयार होऊ लागला आहे. स्थानिक बाजारपेठांमध्येही मोठ्या प्रमाणात देवगड हापूस आंबा उपलब्ध झाला आहे.

ठळक मुद्देदेवगड हापूस आंबा : रोज ५ हजार पेट्या वाशी मार्केटला रवानाअचानक उष्णता वाढल्याने आंबा लवकर परिपक्व

देवगड : तालुक्यामधून देवगड हापूस आंब्याच्या सुमारे ५ हजार पेट्या दररोज वाशी मार्केटला रवाना होत आहेत. अचानक उष्णता वाढल्याने आंबा लवकर तयार होऊ लागला आहे. स्थानिक बाजारपेठांमध्येही मोठ्या प्रमाणात देवगड हापूस आंबा उपलब्ध झाला आहे.

सध्या चारशे ते बाराशे रुपये प्रति डझनाने आंबा स्थानिक बाजारेपठामध्ये विकला जात आहे. तर वाशी मार्केटमधील पाच डझनी पेटीच्या आंब्याला तीन ते साडेतीन हजार रुपये भाव असल्याचे सांगण्यात येत आहे.यावर्षी देवगड हापूस आंबा कलमांना नोव्हेंबर महिन्यामध्ये मोहोर येण्यास सुरुवात झाली होती. नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत विक्रमी असा बहारदार मोहोर देवगड हापूस आंबा कलमांना आला होता. मात्र थ्रीप्स रोगाने थैमान घातल्याने बहुतांशी कमी प्रमाणात आंबा पिक झाले आहे.

सध्या देवगड तालुक्यामधून सुमारे पाच हजार हापूस आंब्याच्या पेट्या वाशी मार्केटला नेहमी रवाना होत आहेत. या हापूस आंब्याच्या पाच डझन पेटीला सुमारे तीन ते साडेतीन हजार रुपये भाव मिळत आहे.याच दर्जाचा आंबा स्थानिक बाजारपेठांमध्ये आठशे ते हजार रुपये डझनने विकला जात आहे. यावरुन वाशी मार्केटमधील आंबा पेटीचा भाव व स्थानिक बाजारपेठामधील आंबा पेटीचा भाव यामध्ये प्रचंड प्रमाणात तफावत जाणवत आहे. यामध्ये स्पष्ट दिसून येते की, वाशी मार्केटमधील दलालांची मक्तेदारी व बागायतदारांची होत असलेली पिळवणूक वाढत चालली आहे.यावर्षी मार्च महिन्याच्या २२ तारीखेपर्यंत थंडी टिकून राहिल्याने बहुतांश आंबा या थंडी व थ्रिप्सचा प्रार्दुभाव वाढल्याने आंबा गळून पडला होता. मात्र २३ मार्च पासून थंडी गायब होऊन उष्णता वाढल्याने खऱ्या अर्थाने आंबा बागायतदारांना दिलासा मिळाला आहे.

उष्णतेमुळे थ्रीप्स रोग संपुष्टाता आला असून आंबाही तयार होण्यास पोषक वातारण निर्माण झाले आहे. देवगड तालुक्यातील बागायतदारांनी पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, बेळगाव या ठिकाणीही भाडे तत्वावरती स्टॉल घेऊन देवगड हापूसची आंबा विक्री सुरु केली आहे. त्याही ठिकाणी चांगला भाव बागायतदारांना मिळत आहे.थ्रीप्स रोगाने शेवटच्या टप्प्यातील मोहोराचे नुकसानडिसेंबर महिन्यामध्ये आलेल्या मोहोराला चांगल्या प्रकारे फळधारणा झाली होती. त्याच मोहोराचे फळ टिकले आहे. मात्र अखेरच्या टप्यातील फेब्रुवारी महिन्यामध्ये आलेल्या मोहोरावरती चांगल्याप्रकारे फळधारणा झाली होती. मात्र थ्रीप्स या रोगाने शेवटच्या टप्यातील आलेल्या मोहोराचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. यामुळे शेवटच्या टप्यातील म्हणजेच मे महिन्यातील हापूस आंबा कमी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

टॅग्स :Mangoआंबाsindhudurgसिंधुदुर्ग