शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: अर्थसंकल्पात १५८ कोटींच्या विकासकामांना मान्यता; देवबाग समुद्रकिनाऱ्यावरील नागरिकांच्या जीविताचे, मालमत्तेचे रक्षण होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 17:48 IST

मालवण : महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरणपूरक आणि संरक्षण व व्यवस्थापन या ४५० कोटी रुपयांच्या प्रकल्पाअंतर्गत देवबाग येथील १५८ कोटी रुपयांच्या ...

मालवण : महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरणपूरक आणि संरक्षण व व्यवस्थापन या ४५० कोटी रुपयांच्या प्रकल्पाअंतर्गत देवबाग येथील १५८ कोटी रुपयांच्या विकासकामांना मान्यता देण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे समुद्रकिनारी वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण होणार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्य अर्थसंकल्पात याबाबत घोषणा केली आहे.तारकर्ली, देवबाग येथे वाहतूक कोंडी टाकण्यासाठी समुद्र आणि खाडीच्या बाजूने बंधारा कम रस्ता व्हावा, अशी येथील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. या बंधारा कम रस्त्यामुळे किनारपट्टीची धूप रोखणे आणि सागरी अतिक्रमणापासून संरक्षण मिळण्याबरोबरच पर्यटन वाढीसाठीही मोठा फायदा होणार आहे.यामध्ये देवबाग, तळाशील येथे किनारपट्टीची धूप थांबविण्यासाठी तामिळनाडूच्या धर्तीवर अद्यावत ग्रोयन्स पद्धतीचे बंधारे उभारणे, देवबागमधील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खाडी किनारी बंधाराकम रस्ता करून घेणे, पर्यटनाच्या दृष्टीने मालवण जेटी ते दांडी किनारपट्टीवर मरीन ड्राइव्हच्या धर्तीवर सुशोभीकरण करून बंधारा काम रस्ता तयार करणे आदी बाबींचा समावेश होता. यंदाच्या अर्थसंकल्पात मालवण किनारपट्टीवरील तब्बल १५८ कोटी रुपयांच्या विकासकांना मान्यता देण्यात आल्यामुळे आमदार नीलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश आले असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे अर्थमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धन्यवाद दिले जात आहेत.आमदार नीलेश राणे यांची होती मागणीस्थानिक आमदार नीलेश राणे यांनी मालवणच्या किनारपट्टी भागाच्या विकासासाठी प्रयत्न सुरू केले होते. निवडून आल्यानंतर त्यांनी महत्त्वाच्या प्रश्नांना हात घालताना मुंबई येथे महाराष्ट्र सागरी मंडळच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत किनारपट्टीवरील महत्त्वाकांक्षी योजनांची संकल्पना मांडली होती.न्याय देणारा अर्थसंकल्प : राणेमाझ्या मतदारसंघातील देवबाग किनारपट्टीवरील १५८ कोटी रुपयांच्या विकासकामांना मान्यता देण्याच्या निर्णयाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार तसेच महायुती सरकारचा आभारी आहे, अशी प्रतिक्रिया आमदार नीलेश राणे यांनी व्यक्त केली आहे.‘लोकमत’ने उठविला वेळोवेळी आवाजदेवबागमधील वाहतूक कोंडी, सागरी अतिक्रमण, किनारपट्टीची धूप आदी प्रश्नांवर ‘लोकमत’मधून सातत्याने आवाज उठविण्यात आला होता. तारकर्ली देवबागमध्ये खाडी आणि समुद्राच्या बाजूने रिंग रोड झाल्यास तारकर्ली, देवबाग गावांचे अनेक प्रश्न मार्गी लागतील. सागरी अतिक्रमणाबरोबरच वाहतूक आणि पर्यटनातील अडथळ्यांमधून नागरिकांची सुटका होईल याकडे लोकप्रतिनिधी आणि शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSea Routeसागरी महामार्गMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2025