शासनाच्या विकास योजना समन्वयाने जनतेपर्यंत पोहचवाव्यात : रविंद्र चव्हाण
By Admin | Updated: May 25, 2017 17:20 IST2017-05-25T17:20:12+5:302017-05-25T17:20:12+5:30
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या मल्टीपर्पज सभागृह व शॉपिंग कॉम्पलेक्स इमारतीचे भूमिपूजन

शासनाच्या विकास योजना समन्वयाने जनतेपर्यंत पोहचवाव्यात : रविंद्र चव्हाण
आॅनलाईन लोकमत
सिंधुदुर्गनगरी, दि. २५ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य जनतेच्?या सर्वांगिण विकासासाठी विविध योजना सुरु केल्?या आहेत. तद्वतच राज्य शासनानेही विविध विकास योजना कार्यान्वित केल्या आहेत. या विकास योजनांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकारी कर्मचा-यांनी समन्वयाने करावे असे आवाहन बंदरे, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी वेंगुर्ला येथे केले.
वेंगुर्ला कॅम्प येथे आयोजित समारंभात वेंगुर्ला नगरपरिषदेच्या मल्टीपर्पज सभागृह व शॉपिंग कॉम्पलेक्स इमारतीचे भूमिपूजन बंदरे राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष राजन गिरप, उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, माजी आमदार राजन तेली, संदेश पारकर, अतुल काळसेकर, अतुल रावराणे, प्रसन्न कुबल, स्नेहा कुबल, सुमन निकम, नागेश गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
नगरपरिषदेस राज्य व केंद्र शासनामार्फत विविध विकास योजनांसाठी निधी प्राप्त होत असतो. याचा विनीयोग विहीत वेळेत व मंजूर विकास कामांवर खर्च होईल याकडे प्रशासना बरोबरच लोक प्रतिनीधी यांनी लक्ष देणे आवश्यक आहे, असे सांगून चव्हाण म्हणाले की, नगरसेवकांनी प्रत्येक प्रभाग निहाय विकास योजनांची तसेच वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या माहिती देण्यासाठी विशेष मोहिमेद्वारे प्रयत्न करावेत.
प्रास्ताविकात मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी या मल्टीपर्पज इमारतीमुळे वेंगुर्ला शहराच्या वैभवात भर पडणार असून समांतर बाजारपेठ उभी राहण्यासाठी मदत होणार असल्याचे सांगून. ते म्हणाले सहा कोटी ३७ लक्ष रुपयांचा हा प्रकल्प असून तो लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नगराध्यक्ष राजन गिरप यांनी शासनाने वेंगुर्ला शहराच्या विकासासाठी भरीव निधी दिल्याबद्दल आभार मानले. प्रशांत आपटे यांनी आभार मानले. समारंभात वेंगुर्ला नगरपरिषदेचे नगरसेवक व वेंगुर्ला शहरातील नागरिक उपस्थित होते.