शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

नरेंद्र उद्यानाचा कायापालट होणार, उद्यानात एलईडी लाईट, निरीक्षण मनोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 18:25 IST

सावंतवाडीतील संस्थानकालीन नरेंद्र डोंगरावरील वन उद्यानाचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय वनविभागाने घेतला असून, उद्यानात एलईडी लाईट बसविण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यानात पर्यटकांसाठी पॅगोडा म्हणजेच निरीक्षण कुटी तसेच बसण्यासाठी बेंच आदी वस्तू ठेवण्यात येणार आहेत. उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांच्यासह वनक्षेत्रपाल गजानन पाणपट्टे यांनी उद्यानाची प्रत्यक्ष पाहणी करून याबाबतचा आराखडा तयार केला आहे. तसेच काही कामे सुरूही करण्यात आली आहेत.

ठळक मुद्देनरेंद्र उद्यानाचा कायापालट होणार, उद्यानात एलईडी लाईट निरीक्षण मनोरे, बेंच बसविण्यात येणार

सावंतवाडी : सावंतवाडीतील संस्थानकालीन नरेंद्र डोंगरावरील वन उद्यानाचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय वनविभागाने घेतला असून, उद्यानात एलईडी लाईट बसविण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यानात पर्यटकांसाठी पॅगोडा म्हणजेच निरीक्षण कुटी तसेच बसण्यासाठी बेंच आदी वस्तू ठेवण्यात येणार आहेत. उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांच्यासह वनक्षेत्रपाल गजानन पाणपट्टे यांनी उद्यानाची प्रत्यक्ष पाहणी करून याबाबतचा आराखडा तयार केला आहे. तसेच काही कामे सुरूही करण्यात आली आहेत.सावंतवाडी शहरापासून काही अंतरावर नरेंद्र डोंगर असून, याच डोंंगराच्या वरच्या बाजूला संस्थानकालीन वनउद्यान आहे. या वनउद्यानाला लागून असलेले मळगाव माजगाव येथील रस्ते आता पूर्ण झाले आहेत. त्यामुळे वनविभागाने आता पुढचे पाऊल टाकले असून, नरेंद्र डोगरांला लागून असलेल्या मुख्य रस्त्याला पर्यटन प्रकल्प जोडण्यात येणार आहे. आता नरेंद्र डोगरावर असलेल्या वनउद्यानाचे रूप पालटणार असून, विशेष म्हणजे या रस्त्याच्या दुतर्फा एलईडी लाईट्स लावण्यात आली असल्यामुळे हा परिसर रात्रीसुद्धा उजळून निघाला आहे.नरेंद्र डोंगराने कुशीत घेतलेल्या सावंतवाडी शहराला या पर्यटन प्रकल्पामुळे अधिकाधिक पर्यटक शहरामध्ये दाखल होतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. वनविभागाच्या या वाईल्ड नेसच्या धर्तीवरील पर्यटन प्रकल्पामध्ये निसर्ग परिचय केंद्र उभारण्यात येणार आहे. याशिवाय पर्यटकांसाठी स्वागत कक्षही उभारण्यात येणार आहे. पर्यटकांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारावरील गेट उभारण्यात येणार आहे. नरेंद्र उद्यानाच्या माथ्यावर रस्त्याच्या कडेने पॅगोडा आणि निरीक्षण कुटीकडे जाणाऱ्या वाटांच्या दुतर्फा एलईडी लाईट लावण्यात आल्या आहेत. या कामाची पाहणी उपवनसंरक्षक चव्हाण यांनी केली.राज्य शासनाच्या चांदा ते बांदा या योजनेंतर्गत नरेंद्र उद्यान पर्यटन प्रकल्पासाठी सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून एक कोटी रुपयांचा भरीव निधी देण्यात आला आहे त्यामुळे सावंतवाडी शहरांमध्ये पर्यटक येतील आणि ते वनविभागाच्या वन उद्यान व निवासी पॅगोडामध्ये निसर्गासोबत पर्यटनाचा आनंद अनुभव देतील असा विश्वास सिंधुदुर्गचे वनविभागाचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.नरेंद्र डोंगर माथ्यावर जाण्यासाठी फोर व्हील ड्राईव्हविशेष म्हणजे या पर्यटकांना नरेंद्र डोंगराच्या माथ्यावर जाण्यासाठी फोर व्हील ड्राईव्ह ठेवण्यात येणार आहे. यातून पर्यटक निसर्गाच्या जवळ जातील, काही क्षण तेथे निसर्गासोबत हितगूज करतील. परतीच्या प्रवासासाठीसुद्धा फोर व्हील ड्राईव्हच्या गाड्या त्यांना सावंतवाडी मळगाव घाटीकडे जाणाºया डिके टुरिझम येथे पर्यटकांना सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे नरेंद्र डोंगर पर्यटनासाठी जाणाºया पर्यटकांना वनवे निसर्ग पर्यटन प्रवास करावा लागणार आहे. पर्यटकांना वाहन पार्किंगसाठी खासगी जमीन भाडेतत्त्वावर घेण्याचाही विचार वनविभागाने सुरू केली असून त्यादृष्टीने चाचपणी सुरू असल्याचे उपवनसंरक्षक चव्हाण यांनी सांगितले.एक कोटीचा निधी खर्चनरेंद्र डोगरांतील उद्यानावर पर्यटना अंतर्गत सुमारे एक कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे. सावंतवाडी शहरातील नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या हनुमान मंदिरापासून ते थेट नरेंद्र डोंगराच्या माथ्यावर असलेल्या वनजमिनीत निसर्ग परिसर केंद्रासह उडन हाऊस प्रकल्प सुरू होत आहे. या प्रकल्पामध्ये पर्यटकांना निसर्ग निरीक्षणासाठी ३ पॅगोडा उभारण्याचे काम सुरू आहे.

या पॅगोडाना निरीक्षण कुटी असे वनविभागाने नाव दिले आहे याशिवाय ५ उडन हाऊस उभारण्यात येणार आहेत. निसर्गाच्या सानिध्यात त्यामध्ये राहून पर्यटकांना निसर्गाची जवळीक साधण्यासाठी हा नरेंद्र उद्यान पर्यटन प्रकल्प सुरू होत करण्यात आल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. निसर्ग पर्यटनासाठी नरेंद्र डोंगर उद्यान सज्ज झाले असल्याचेही ते म्हणाले. 

टॅग्स :tourismपर्यटनsindhudurgसिंधुदुर्ग