देवस्थानांचा विकास करणार

By Admin | Updated: August 3, 2015 21:28 IST2015-08-03T21:28:35+5:302015-08-03T21:28:35+5:30

दीपक केसरकर : जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे बक्षीस वितरण

Developing Devasthanas | देवस्थानांचा विकास करणार

देवस्थानांचा विकास करणार

सावंतवाडी : मंत्रिपदाच्या माध्यमातून राज्यातील देवस्थानांचा पर्यटनदृष्ट्या विकास करणार आहे, असे आश्वासन वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. येथील विठ्ठल मंदिरात हरिनाम वीणा सप्ताहानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी नगरसेविका कीर्ती बोंद्रे, शर्वरी धारगळकर, अर्बन बँकेचे चेअरमन गोविंद वाडकर, शशिकांत नेवगी, अ‍ॅड. दीपक नेवगी, बाळा बोर्डेकर, आबा केसरकर, गिरीधर परांजपे, मंगेश तळवणेकर, नंदकिशोर शिरोडकर, आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते भजन स्पर्धेतील विजेत्या संघांना बक्षीस वितरण झाले. भजन स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतलेल्या आबा केसरकर, शशिकांत नेवगी, मंगेश तळवणेकर, नंदकिशोर शिरोडकर, आदींचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)



विजेत्यांना गौरविले
प्रथम क्रमांक विजेते गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल-वेंगुर्ले) यांना ७ हजार ७७७ रुपये व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक विजेते सातेरी दशावतारी प्रासादिक भजन मंडळ यांना ५ हजार ५५५ रुपये व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक विजेते सावंतवाडी येथील सद्गुरू प्रासादिक भजन मंडळाला ३ हजार ३३३ रुपये व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ट गायक अजित पंडित (माऊली प्रासादिक भजन मंडळ, कास), उत्कृष्ट हार्मोनियम-अनिल पांचाळ (रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ, कुडाळ), उत्कृष्ट पखवाज-समीर गोडकर (राष्ट्रोळी प्रासादिक भजन मंडळ, भोगवे), उत्कृष्ट शिस्तबद्ध संघ सद्गुरू प्रासादिक भजन मंडळ, म्हापण-मालवण, उत्तेजनार्थ महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, त्रिंबक -गाडवाडी (मालवण), उत्तेजनार्थ गायक संतोष धर्णे (स्वामी समर्थ भजन मंडळ, कलंबिस्त), उत्कृष्ट कोरस-मळगाव सावळवाडा भजन मंडळ यांना गौरविण्यात आले.

Web Title: Developing Devasthanas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.