शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

देवस्थान जमिनींचा १ मार्चपासून सर्व्हे  : महेश जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 14:45 IST

Mahesh Jadhav Sindhudurg- देवस्थान समितीच्यावतीने वहिवाटदार व लिलावदार पद्धतीने देण्यात आलेल्या जमिनीचा चुकीचा, गैरवापर करण्यात येत असून, जिल्ह्यातील या जमिनींबाबतचा सर्व्हे १ मार्चपासून सार आयटी समितीच्या वतीने करण्यात येणार आहे. यामध्ये चुकीच्या पद्धतीने जमिनीचा वापर करणाऱ्यांना नोटिसा बजावून त्यांच्या जमिनी त्यांच्याकडून काढून घेण्यात येतील, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी कुडाळ येथील पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देदेवस्थान जमिनींचा १ मार्चपासून सर्व्हे  : महेश जाधव चुकीचा, गैरवापर होत असल्याचे आले निदर्शनास

कुडाळ : देवस्थान समितीच्यावतीने वहिवाटदार व लिलावदार पद्धतीने देण्यात आलेल्या जमिनीचा चुकीचा, गैरवापर करण्यात येत असून, जिल्ह्यातील या जमिनींबाबतचा सर्व्हे १ मार्चपासून सार आयटी समितीच्या वतीने करण्यात येणार आहे. यामध्ये चुकीच्या पद्धतीने जमिनीचा वापर करणाऱ्यांना नोटिसा बजावून त्यांच्या जमिनी त्यांच्याकडून काढून घेण्यात येतील, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी कुडाळ येथील पत्रकार परिषदेत दिली.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव तसेच इतर समिती सदस्य हे तीन दिवसांच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. कुडाळ येथे मार्गदर्शन मेळाव्याचे समितीच्यावतीने आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यानंतर महेश जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली.यावेळी समितीचे सदस्य राजेंद्र जाधव, राजाराम गरुड, चारुदत्त देसाई, सचिव विजय पवार, कार्यकारी अधिकारी शिवाजी साळवी, शीतल इंगवले, अभियंता सुयश पाटील, देविका जरग पाटील, उत्तम मिटके, बाळकृष्ण ननवरे तसेच जिल्ह्यातील इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.यावेळी जाधव यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात समितीची १९९ मंदिरे असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमिनी आहेत. मात्र, अनेक देवस्थान व जमिनींबाबतचे प्रश्न, समस्या आहेत ते ऐकून घेऊन समस्यांचे, प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी समितीचा हा तीन दिवस दौरा आहे.देवस्थानच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात वहिवाटदार व लिलाव पद्धतीने जमिनी देण्यात आलेल्या आहेत. मात्र, जमिनी मिळालेल्या भूधारकांनी मंदिरालाही उत्पन्नातून खर्च, खंड दिला पाहिजे. मात्र, तो दिला जात नाही. तसेच या जमिनीमध्ये पोटकुळे, उपकुळे, भाडेतत्त्वावर देणे असे चुकीचे प्रकार होत आहेत. गैरवापरही केला जात आहे, अशी प्रकरणे दिसून येत आहेत.अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारासध्या जिल्ह्यात तीन ठिकाणी जमिनींचा वापर केलेली तीन प्रकरणे निदर्शनास आली आहेत. कोकणात २८ हजार एकर जमीन तर ३८ हजार ४२ मंदिरे समितीकडे आहेत. या जमिनींचा व देवळांचा संपूर्ण सर्व्हे करण्यासाठी सार आयटी या समितीची नियुक्ती करण्यात आली असून, ही समिती सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८३ मुद्यांबाबत १ मार्चपासून अधिकृत सर्व्हे करणार आहे. त्याला सर्वांनी सहकार्य करावे. जो कोणी द्यायला विरोध करेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू, असाही इशारा जाधव यांनी दिला. 

टॅग्स :Mahesh Jadhavमहेश जाधवMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरsindhudurgसिंधुदुर्गReligious Placesधार्मिक स्थळे