शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

..तर दीपक केसरकरांना निवडून आणावेच लागेल, नितेश राणेंचे सूतोवाच 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: March 11, 2023 14:29 IST

ठाकरे शिवसेना आता जवळपास संपली

कणकवली : राज्यात भाजप शिवसेनेची युती असल्याने भविष्यात २०२४ च्या निवडणुकीत जिल्ह्यातील एक मतदार संघ सेनेच्या वाट्याला गेला तर विद्यमान आमदार व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना निवडून आणावेच लागेल. असे सूतोवाच भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी कणकवली येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केले. तसेच खासदारही भाजप सेना युतीचाच असेल मात्र ही कोणाकडे जाते याबाबतची बोलणी वरीष्ठ स्तरावर सुरू आहे. आपण यावर भाष्य करणार नाही. मात्र, ठाकरे सेनेचा खासदार यापुढे नसेल, असेही राणे यांनी स्पष्ट केले.आमदार नितेश राणे यांनी कणकवली येथील पत्रकार परिषदेत राजकीय भाष्य करताना जिल्ह्यातील आगामी राजकारणाची रणनितीच स्पष्ट केली. राणे म्हणाले, दीपक केसरकर हे शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत. तसेच ते  भाजप शिवसेना युतीच्या राज्य मंत्रीमंडळात शिक्षणमंत्री आहेत. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक भाजप शिवसेना युती म्हणून लढविली जात असताना जर एक जागा शिवसेनेकडे गेली तर दीपक केसरकर यांना निवडून आणणे युती म्हणून आमची जबाबदारी असेल.एकेकाळी राणे समर्थक असलेलेच आज ठाकरे सेनेचे सिंधुदुर्गात नेतृत्‍व करत आहेत. ठाकरे सेनेच्या तीन जिल्‍हाप्रमुखांपैकी दोन मुख्यमंत्री शिंदे यांच्या संपर्कात आहेत. तर एक जण आमच्या संपर्कात आहे. त्‍यामुळे सिंधुदुर्गातील ठाकरे सेना किती दिवस जिवंत ठेवायची हे आमच्यावर आहे.राणे म्‍हणाले, उद्धव ठाकरे यांनी नेहमीच निष्‍ठावंत शिवसैनिकांवर अन्याय केला आहे. ठाकरे स्वत:ची शिवसेना बांधू शकले नाहीत हे चित्र संपूर्ण महाराष्‍ट्राची जनता आज पाहत आहे. सिंधुदुर्गातील ठाकरे शिवसेना आता जवळपास संपली आहे. आम्‍ही व्हेंटीलेटरची वायर काढली की लगेच ठाकरे सेनेचे अस्तित्व संपुष्‍टात येणार आहे. कारण नुकतेच नेमण्यात आलेले तिनही जिल्‍हाप्रमुख आमच्या संपर्कात आहेत. यातील दोघे केव्हाही शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहेत. तर तिसरा जिल्‍हाप्रमुख आमच्याकडे येणार आहे. त्‍यामुळे जिल्‍ह्‍यातील तीनही आमदार आणि खासदार देखील आमचाच असणार आहे.

सिंधुदुर्गात एक मतदारसंघ शिंदे गटाला सोडणार का? या प्रश्‍नावर बोलताना राणे म्‍हणाले, जे विनर सीट आहेत, त्‍या तशाच राहतील. तसेच केसरकर हे शिंदे गटाचे प्रमुख आहेत. त्‍यामुळे सावंतवाडीत आम्‍हाला त्‍यांना निवडून आणावं लागेल. तर खासदारकीसाठी शिंदे गट की भाजपचा उमेदवार असेल याबाबतचा निर्णय वरिष्‍ठ पातळीवर होईल. पण कोणत्‍याही परिस्थितीत शिवसेना ठाकरे गटाचा खासदार निवडून येणार नाही.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर Nitesh Raneनीतेश राणे Electionनिवडणूक