शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
3
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
4
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
5
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
6
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
7
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
8
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
9
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
10
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
11
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
12
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
13
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
14
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
15
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
16
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
17
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
18
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
19
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
20
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मातृवृक्ष नारळाची नर्सरी उभारणार : दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2018 4:05 PM

केरळ येथील मातृवृक्ष नारळाच्या झाडाची नर्सरी सिंधुदुर्गात उभारण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारी रोपे याठिकाणी मागविण्यात येणार असून त्यांची मंजुरी येत्या आठ दिवसांत देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यात मातृवृक्ष नारळाची नर्सरी उभारणार : दीपक केसरकरजागतिक नारळ दिन; आठ दिवसांत मंजुरी देणार

सावंतवाडी : केरळ येथील मातृवृक्ष नारळाच्या झाडाची नर्सरी सिंधुदुर्गात उभारण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारी रोपे याठिकाणी मागविण्यात येणार असून त्यांची मंजुरी येत्या आठ दिवसांत देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नारळ उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा लवकरच या ठिकाणी घेण्यात येईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे दिले.दरम्यान, नारळ बागायतदारांसाठी शासनाच्या अनेक योजना असूनही शेतकरी त्याचा लाभ का घेत नाहीत याचे उत्तर कृषी विभागाने द्यावे. यात दोषी आढळल्यास कितीही मोठा अधिकारी असला तरी त्याची गय करणार नाही, असा सूचक इशाराही यावेळी पालकमंत्र्यांनी दिला.सिंधुदुर्ग नारळ विकास बोर्डाच्यावतीने येथील नगरपालिकेच्या बॅ. नाथ पै सभागृहात जागतिक नारळ दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा नारळ उत्पादक संघाचे अध्यक्ष सुरेश गवस, नारळ विकास बोर्डाचे ठाणे उपसंचालक प्रमोद कुरियन, नारळ उत्पादक संघाचे कोषाध्यक्ष रामानंद शिरोडकर, निवृत्त कृषी अधिकारी डॉ. दिलीप नागवेकर, तालुका कृषी अधिकारी प्रमोद सावंत, उपविभागीय कृषी अधिकारी अडसूळ, रणजित सावंत, शिवसेना तालुकाध्यक्ष रुपेश राऊळ, बबन राणे आदी उपस्थित होते.केसरकर पुढे म्हणाले, नारळ उत्पादक संघाच्यावतीने दर चार गावांमधून एक समिती स्थापन करा. या माध्यमातून शेतकरी बागायतदारांना योजना उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. याशिवाय येथील शेतकरी, बागायतदार सक्षम व्हावा यासाठी केरळच्या धर्तीवर निरा काढण्यासाठी लागणारी आवश्यक परवानगी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

ही परवानगी मिळताच त्याला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबरोबरच बागायतदारांना निरा ठेवण्यासाठी आवश्यक गोष्टी पुरविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.|केरळमध्ये असलेली मातृवृक्ष ही नारळाची प्रजात या ठिकाणी आणून येथील बागायदारांना नर्सरी उभारण्यासाठी मदत केली जाणार आहे. त्यासाठी बागायतदारांनी पुढाकार घ्यावा. भविष्यात ज्या गावांच्या बाजूने तिलारी कालवा गेला आहे, मात्र उंच भागातील गावांना व बागायतदारांना त्याचा लाभ मिळत नाही, अशांकरिता सौर विद्युत पंपाद्वारे भूमिगत वाहिन्यांमधून पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहनही त्यांनी केले.प्रास्ताविक ठाणे नारळ विकास बोर्डाचे उपसंचालक प्रमोद कुरियन यांनी केले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील नारळ बागायतदार उपस्थित होते. चिपी येथील विमानतळ लवकरच सुरु होईल. ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे असेल. मात्र हे करताना येथील शेतकऱ्याचा मुलगा वैज्ञानिक व्हावा यासाठी तेथे ट्रेनिंग स्कूल उभारण्यात येणार आहे, असे केसरकर यांनी सांगितले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्ग