शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
3
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
4
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
5
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
6
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
7
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
8
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
9
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
10
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
11
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
12
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
13
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
14
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
15
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
16
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
17
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
18
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
19
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
20
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

हळदीचे नेरूर येथे मोबाईल मनोऱ्याचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 13:58 IST

Vinayak Raut Sindhudurg- वंचित भागाचा कच्चा दुवा पकडून आपण कोकणच्या सह्यपट्ट्यात सर्वत्र मोबाईलची रेंज कशी मिळेल यावर आपला जोर राहील, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केले.

ठळक मुद्दे हळदीचे नेरूर येथे मोबाईल मनोऱ्याचे लोकार्पणकणकवली पंचायत समिती सभेत सदस्य आक्रमक

माणगाव : जागतिकीकरणाच्या या धकाधकीच्या काळात माहिती आणि तंत्रज्ञानाने जगाच्या कक्षा रूंदावल्या आहेत. अन्न, वस्त्र व निवारा या माणसांच्या मूलभूत गरजांसोबत मोबाईलचा वापर हीसुद्धा अत्यावश्यक बाब बनली आहे. ग्रामीण व दुर्गम भागांत मोबाईल मनोऱ्याची वानवा असल्याने येथील लोक हताश झाले आहेत.

वंचित भागाचा हाच कच्चा दुवा पकडून आपण कोकणच्या सह्यपट्ट्यात सर्वत्र मोबाईलची रेंज कशी मिळेल यावर आपला जोर राहील, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केले.कुडाळ तालुक्यातील हळदीची नेरूर येथील मोबाईल मनोऱ्याचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी उपसभापती श्रेया परब, कुमारी रूची राऊत, अमर सावंत, राजू कविटकर, बाळ सावंत, सरपंच सागर म्हाडगुत, बबन बोभाटे, योगेश धुरी, श्रीकृष्ण परब, राजन नाईक, लवू पालकर, सुनील सावंत, श्रीकृष्ण नेवगी, तुषार परब, आत्माराम सावंत, यशवंत कदम, यासह दूरसंचार खात्याचे प्रवीणकुमार आणि नितीशजी उपस्थित होते. बाळ सावंत यांनी प्रास्ताविक केले. श्रेया परब व अमरसेन सावंत यांनी विचार मांडले.अजून चार मोबाईल मनोरे कार्यान्वित होतीलखरेतर हळदीचे नेरुर मोबाईल टॉवरचे उद्घाटन गेल्यावर्षीच्या मे महिन्यातच होणार होते. पण कोरोना विषाणूच्या जागतिक महामारीने लॉकडाऊनचा सिलसिला सुरू झाला. त्यामुळे लोकांची रेंज मिळण्याची प्रतीक्षा आणखी लांबत गेली. पण आपण दिलेला शब्द पाळतो म्हणजे पाळतो. त्याचं फलित म्हणजे हा आजचा मोबाईल मनोऱ्याचे लोकार्पण सोहळा होय. या भागात आता इतर चार ठिकाणी मोबाईलचे मनोरे कार्यान्वित होतील. त्यात प्रामुख्याने महादेवाचे केरवडे व वसोली येथील केंद्रांचा समावेश असेल असेही खासदार विनायक राऊत म्हणाले. 

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत sindhudurgसिंधुदुर्गMobileमोबाइल