शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार : विनायक राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 14:03 IST

Irrigation Projects Sindhdudurg- अनेक प्रकल्पांच्या घोषणा आजवर झाल्या; मात्र ठेकेदाराकडून मलिदा मिळवून प्रकल्प अर्धवट सोडण्यात आले. आता कणकवली तालुक्यातील दहा लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करण्याचा ध्यास आम्ही घेतला आहे, असे आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी दिले. भिरवंडे आणि गांधीनगर येथील बिनविरोध आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार राऊत यांच्य हस्ते झाला. तसेच स्केटिंगमध्ये राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिक मिळवलेल्या पार्थ बाळकृष्ण सावंत यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.

ठळक मुद्देलघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार : विनायक राऊत बिनविरोध आलेल्या सदस्यांचा सत्कार

कणकवली : अनेक प्रकल्पांच्या घोषणा आजवर झाल्या; मात्र ठेकेदाराकडून मलिदा मिळवून प्रकल्प अर्धवट सोडण्यात आले. आता कणकवली तालुक्यातील दहा लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करण्याचा ध्यास आम्ही घेतला आहे, असे आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी दिले. भिरवंडे आणि गांधीनगर येथील बिनविरोध आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार राऊत यांच्य हस्ते झाला. तसेच स्केटिंगमध्ये राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिक मिळवलेल्या पार्थ बाळकृष्ण सावंत यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.भिरवंडे खलांतर येथील अण्णा मास्तर यांच्या घरामध्ये छोटेखानी झालेल्या कार्यक्रमात राऊत यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद सदस्य संजय आग्रे, शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत, शिवसेनेचे नेते बाळा भिसे आदी उपस्थित होते.यावेळी खासदार राऊत यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कारही करण्यात आला. राऊत म्हणाले, ग्रामपंचायत कोणत्या पक्षाची होती, याहीपेक्षा ती बिनविरोध झाली, याला फार महत्त्व आहे. त्यामुळे शासनाकडून मिळणारे मोठे मानधनही या ग्रामपंचायतीला मिळेल.मात्र जिल्हा वार्षिक नियोजनातून पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आपण या ग्रामपंचायतींसाठी विशेष निधीदेऊ, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.सिंधुदुर्ग जिल्ह्याला सिंचन क्षमता वाढविण्याची गरज आहे. ही भूमिका आम्ही पहिल्यापासून ठेवली असून, आता माणगाव खोर्‍यातील छोटी धरणे पूर्ण करणारा, त्याचबरोबर कणकवली तालुक्यात लघुपाटबंधारे १० धरण प्रकल्प रखडलेले आहेत. अशा प्रकल्पांचे काम तातडीने पूर्ण करावे किंवा दोन वर्षात मार्गी लावण्याचा ध्यास आम्ही घेतला.यासाठी पालकमंत्री आणि मी स्वतः यात लक्ष घालणार असून, सतीश सावंत यांना जबाबदारी देण्यात आली आहे. भिरवंडे आणि गांधीनगर येथे सदस्य बिनविरोध निवडून आले. त्यामुळे मला आनंद आहे.विकासाची गंगा पुढे नेत आहोत : सतीश सावंतखासदार राऊत यांच्या माध्यमातून विकासाची गंगा पुढे नेत आहोत. सह्याद्री पट्ट्यातील धरण प्रकल्प चांगली संकल्पना आहे. ती पूर्णत्वास नेण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे यावेळी सतीश सावंत म्हणाले. 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पVinayak Rautविनायक राऊत sindhudurgसिंधुदुर्ग