कणकवली उपजिल्हा रूग्णालयात प्रसूत महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: September 5, 2015 23:50 IST2015-09-05T23:48:27+5:302015-09-05T23:50:51+5:30

गोवा येथे अधिक उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू

Death of a woman in Kankavali sub-district hospital | कणकवली उपजिल्हा रूग्णालयात प्रसूत महिलेचा मृत्यू

कणकवली उपजिल्हा रूग्णालयात प्रसूत महिलेचा मृत्यू

कणकवली : येथील उपजिल्हा रूग्णालयात प्रसूत झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. सृष्टी गिरीश भावे (वय २९, रा.चिंदर) असे या महिलेचे नाव असून गोवा येथे अधिक उपचारासाठी त्यांना नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. प्रसूतीसाठी दोन दिवसांपूर्वी सृष्टी भावे यांना उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्रसूत होऊन त्यांना मुलगा झाला. त्यानंतर अत्यवस्थ झाल्याने त्यांना कणकवलीतील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून अधिक उपचारासाठी गोवा,बांबुळी येथे नेत असताना शुक्रवारी रात्री वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)

Web Title: Death of a woman in Kankavali sub-district hospital