धबधब्यावरून पडून एकाचा मृत्यू

By Admin | Updated: July 28, 2014 23:16 IST2014-07-28T21:58:12+5:302014-07-28T23:16:12+5:30

आंबोलीतील घटना, कोलगावातील युवक

Death of one after falling from the waterfall | धबधब्यावरून पडून एकाचा मृत्यू

धबधब्यावरून पडून एकाचा मृत्यू

सावंतवाडी : आंबोलीतील हाउसफुल्ल वर्षा पर्यटनाचा फटका कोलगाव (सावंतवाडी) येथील पर्यटकांला बसला आहे. धबधब्यावर मौजमजा करत असताना भिवा गणपत चेंदवणकर (२४) हा रविवारी दुपारच्या सुमारास गंभीररित्या जखमी झाला होता. त्याला अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले होते. मात्र, तेथेच त्याचे रात्रीच्या सुमारास निधन झाले. या घटनेनंतर कोलगाव परिसरावर शोककळा पसरली आहे.याबाबत माहिती अशी की, आंबोली वर्षा पर्यटनाचा लाखो पर्यटक हे आनंद लुटत असतात. रविवारी तर तुडूंब गर्दी असते. अनेक पर्यटक मुख्य धबधब्यावर पाण्यात खेळत असतात. रविवारी ही आंबोलीत तब्बल ६० ते ७० हजार पर्यटक होते. याचवेळी कोलगाव येथील भिवा चेंदवणकर हा आपल्या मित्रांसमवेत या पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आंबोली येथे गेला होता.दुपारच्या सुमारास मुख्य धबधब्यावर पाण्याचा आनंद लुटत असतानाच अचानक भिवा खाली कोसळला. यात त्याला दुखापत झाली होती. त्याला मित्रांनी तसेच तेथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी तातडीने गोवा बांबोळी येथे हलविले.
मात्र, रात्री उशिरा भिवा चेंदवणकर याचे निधन झाले. भिवा हा होतकरू मुलगा होता. तसेच सावंतवाडीत दुकानात तो काम करीत होता. घटनेनंतर येथील पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मुख्य धबधब्यावर पाय घसरून पडल्याचे म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Death of one after falling from the waterfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.