टॅ्रक्टरखाली सापडून शेतकऱ्याचा मृत्यू

By Admin | Updated: June 28, 2014 00:17 IST2014-06-28T00:16:09+5:302014-06-28T00:17:57+5:30

निगुडे-घरभाटले येथे शेतात नांगरणी करत असताना

The death of the farmer under the tractor | टॅ्रक्टरखाली सापडून शेतकऱ्याचा मृत्यू

टॅ्रक्टरखाली सापडून शेतकऱ्याचा मृत्यू

बांदा : निगुडे-घरभाटले येथे शेतात नांगरणी करत असताना ट्रॅक्टरखाली सापडल्याने गावठणवाडी येथील तुकाराम पांडुरंग गावडे (वय ७0) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना काल, गुरुवारी सायंकाळी उशिरा घडली. याबाबत बांदा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
याबाबतची माहिती त्यांचा मुलगा सिद्धिविनायक तुकाराम गावडे यांनी बांदा पोलिसांत दिली. गुरुवारी तुकाराम गावडे मुलासह आपल्या शेतात ट्रॅक्टरच्या सहायाने नांगरणी करीत होते. यावेळी ते ट्रॅक्टरखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. बांदा पोलीस उपनिरीक्षक सुधाकर आरोलकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. अधिक तपास बांदा पोलीस उपनिरीक्षक सुधाकर आरोलकर करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The death of the farmer under the tractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.