शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

आचिर्णेतील १०४ वर्षीय वैदू आजीचे निधन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 21:14 IST

वनौषधींच्याद्वारे लोकांची प्रकृती ठणठणीत करणा-या आचिर्णे धनगरवाडा येथील १०४ वर्षीय वैदू आजी गंगुबाई जनू बोडके यांचे निधन झाले.

वैभववाडी - वनौषधींच्याद्वारे लोकांची प्रकृती ठणठणीत करणा-या आचिर्णे धनगरवाडा येथील १०४ वर्षीय वैदू आजी गंगुबाई जनू बोडके यांचे निधन झाले. आचिर्णेतील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.गंगुबार्इंनी चार पिढ्या एकत्र कुटुंब पद्धतीत नांदवल्या. कुटुंबाचा शेळ्यांचा पारंपरिक व्यवसाय असल्यामुळे त्यांचे सतत जंगलात फिरणे असायचे. आई, वडील आणि त्यानंतर सास-यांकडून त्यांना जंगलातील वनौषधींचे ज्ञान मिळाले होते. डोळ्यातील दोष, अर्धशिशी (डोकेदुखी), पोटदुखी, कावीळ यांसह विविध आजारांवर त्या रामबाण औषध देत होत्या.जंगलातील काट्याकुट्यात फिरून त्या वनौषधी गोळा करीत असत. आपल्याकडे येणा-या प्रत्येकाची प्रकृती ठणठणीत बरी करण्यासाठी सतत प्रयत्न करणा-या या वैदू आजीची प्रकृती शंभरीनंतरही ठणठणीत होती.जानेवारी २०१८ मध्ये गंगुबार्इंना १०३ वर्षे पूर्ण झाली. मात्र गेल्या दीड-दोन महिन्यांपासून वृद्धापकाळामुळे त्या अंथरुणाला खिळून होत्या. त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नव्हती. बुधवारी सायंकाळी या वैदू आजीने जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे, पणतवंडे असा मोठा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते संतोष बोडके यांच्या त्या आजी होत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गnewsबातम्या