शहरं
Join us  
Trending Stories
1
नफ़रत नहीं, नौकरी चुनो! 'इंडिया'चे सरकार बनतंय; ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणार : राहुल गांधी
2
"आमचे अणुबॉम्ब कायम सज्ज असतात"; रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची अमेरिकेला खुली धमकी
3
“उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले, मानसोपचार तज्ज्ञांची गरज”: देवेंद्र फडणवीस
4
शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 1000 तर निफ्टी 350 अंकांनी घसरले, 7 लाख कोटी बुडाले
5
...मग काय अमित शाह येताहेत का इंडिया आघाडीत?, आम्ही त्यांना पंतप्रधान करतो : संजय राऊत
6
Amit Shah : Video - "तीन टप्प्यात भाजपाने किती जागा जिंकल्या?"; अमित शाह यांची 'भविष्यवाणी'
7
'प्रत्येक गोष्टीला कारण असतं', हास्यजत्रा सोडल्यानंतर गौरव मोरेने चाहत्यांच्या प्रश्नांना दिलं उत्तर
8
"डबल इंजिन सरकारने शेतकरी, मजुरांना डबल झटका दिला; भाजपा संविधानाशी खेळतेय"
9
“बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरु करणार”: पीयूष गोयल 
10
जलेबी बाबाचा तुरूंगात मृत्यू! मादक पदार्थ देऊन महिलांवर करायचा बलात्कार, अनेकांना फसवले
11
"हो, कपिल शर्मा शोची कॉपी केली", 'चला हवा येऊ द्या'बाबत निलेश साबळेचं स्पष्ट वक्तव्य
12
Success Story: Google चे सीईओ सुंदर पिचाईंची क्लासमेट, IIT च्या 'त्या' बॅचची एकमेव महिला; आता बनली 'या' कंपन्यांची बॉस
13
Tata Harrier आणि Safari वर 1.25 लाखांपर्यंत डिस्काउंट तर अनेक कारवर मोठ्या ऑफर्स
14
देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्राला 'उबाठा'चीही मान्यता; भाजपाचा हल्लाबोल 
15
भारतामध्ये ६५ वर्षांत हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली, अहवालावरून खळबळ, भाजपा-कांग्रेसचे आरोप प्रत्यारोप   
16
WhatsApp कॉल आता आणखी सोपे होणार! नवीन फीचर कॉल मॅनेजमेंटला सुपरफास्ट बनवणार
17
अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ! दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडी मोठं पाऊल उचलणार
18
अक्षय्य तृतीया: कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे, आद्य समाजसुधारक, संत महात्मा बसवेश्वरांची जयंती
19
IPL 2024: लखनौच्या फ्रँचायझीने पोलिसांचे १० कोटी रूपये थकवले; एका सामन्याची फी आहे...
20
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल किर्तीकरांच्या प्रचारात?; Video व्हायरल

मृत महिला जखमीची पत्नी नाही, बेळगावमधील रहिवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 5:21 PM

आंबोली येथे बुधवारी सायंकाळी अपघातानंतर कारने पेट घेतला होता. मात्र, प्रसंगावधान राखत कारच्या चालकाने बाहेर उडी मारल्याने सुदैवाने तो बचावला. कारमध्ये असलेली महिला अडकून पडल्याने ती पूर्णत: जळाली आणि त्यात मृत पावली होती.

ठळक मुद्देमृत महिला जखमीची पत्नी नाही, बेळगावमधील रहिवासी :जखमी चालक तिचा कौटुंबिक डॉक्टर, आंबोलीतील कार जळीत प्रकरण

सावंतवाडी : आंबोली येथे बुधवारी सायंकाळी अपघातानंतर कारने पेट घेतला होता. मात्र, प्रसंगावधान राखत कारच्या चालकाने बाहेर उडी मारल्याने सुदैवाने तो बचावला. कारमध्ये असलेली महिला अडकून पडल्याने ती पूर्णत: जळाली आणि त्यात मृत पावली होती.

या दोघांची ही नावे निष्पन्न करण्यात गुरूवारी पोलिसांना यश आले असून यातील मृत महिला रिझवाना अस्लम पाथरवाट (४५, रा. कंग्राळगल्ली बेळगाव) जखमी चालक दुड्डाप्पा बांगरप्प पद्दण्णवार (४७, रा. बेळगाव) असे आहे. मृत महिलेचा दुडाप्पा हा कौटुंबिक डॉक्टर असून, त्याच्या सोबत ती सिंधुदुर्गमध्ये आली होती.

दोन दिवस सिंधुदुर्ग मधील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये वास्तव्यास होती. पोलिसांनी प्रथम दर्शनी अपघाताचाच गुन्हा दाखल केला असून, अद्याप पर्यंतच्या तपासात कोणताही घातपात नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.आंबोलीतील मुख्य धबधब्याच्या ठिकाणी कार चालक दुडाप्पा पद्दणवार याने आंबोलीच्या दिशेने येणाऱ्या चौकुळ येथील सत्यप्रकाश गावडे यांच्या कारला धडक दिली आणि तो सुसाट कार सावंतवाडीच्या दिशेने घेऊन निघाला होता. मात्र, धबधब्या पासून काही अंतरावर कारचा मोठा स्फोट झाला आणि कारने पेट घेतला.

प्रसंगावधान राखत दुडाप्पा याने कारमधून बाहेर उडी मारली. मात्र, रिझवाना ही कारमध्येच अडकून पूर्णत: जळाली आणि मृत पावली. जखमी दुडाप्पा याला गोवा बांबुळी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मृत रिझवाना हिचे नातेवाईक दुपारी आंबोलीत दाखल झाले. तिचा जावई हा कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथे असतो. तर तिचा मुलगा मद्रास येथे नोकरीनिमित्त असल्याचे पोलिसांनी सांगितले. महिलेचा मृत नातेवाईकांनी ताब्यात घेऊन ते बेळगावकडे रवाना झाले आहेत.

जखमी दुडाप्पा हा डॉक्टर असल्याने मृत रिझवाना पाथरवाट यांचे कुटुंब त्यांना ओळखायचे रिझवाना यांना दोन मुले यातील मुलगीचे लग्न झाले आहे. तर मुलगा नोकरीनिमित्त मद्रास येथे असतो. त्यामुळे रिझवाना ही बेळगाव येथे एकटीच रहायची. त्यामुळे दुडाप्पा हा कौटुंबिक डॉक्टर असल्याने त्याच्या सोबत गेले दोन दिवस ती सिंधुदुर्गमध्ये आली होती.

त्यातील एक दिवस आंबोली तर दुसऱ्य दिवस मालवण वायरी येथे वास्तव्यास होती. दोन्ही हॉटेलमध्ये पती पत्नी असल्याचे सांगूनच वास्तव्यास असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. तसेच महिलेच्या नातेवाईकांनीही अद्यापपर्यंत कोणतीही तक्रार दिली नाही. त्यामुळे कारचालक जखमी दुडाप्पा पद्दण्णवार यांच्यावर हयगयीने अविचाराने गाडी चालवून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सावंतवाडी पोलिसांनी सांगितले.माझ्या बायकोला वाचवा : दुडाप्पाची आर्त हाकअपघातानंतर दुडाप्पा याने कारमधून उडी मारल्यानंतर दुडाप्पा हा अनेक गाड्यांना थांबवून कारमध्ये माझी बायको आहे. तिला वाचवा असे सांगत होता. तर रूग्णालयात दाखल केल्यानंतर ही तो सतत माझ्या बायकोला वाचवा असेच सांगत होता. त्यामुळे आता नेमका प्रकार काय हे जखमी दुडाप्पाच सांगू शकेल, सध्या तो उपचार घेत असल्याने त्याचा जबाब घेण्यात आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्ग