चिमुकल्या अर्पणचा मृतदेह अखेर सापडला

By Admin | Updated: May 28, 2014 01:34 IST2014-05-28T01:15:45+5:302014-05-28T01:34:26+5:30

आशेवर पाणी पसरले

The dead body of the smallpox was finally found | चिमुकल्या अर्पणचा मृतदेह अखेर सापडला

चिमुकल्या अर्पणचा मृतदेह अखेर सापडला

 दापोली : समुद्रात बुडाल्यानंतर दोन दिवस पत्ता लागला नसला, तरी लहानग्या अर्पणच्या कुटुंबीयांच्या मनात कुठेतरी भाबडी आशा जिवंत होती. आज, मंगळवारी सकाळी त्यांच्या या आशेवर पाणी पसरले. आठ वर्षांचा अर्पण सापडला; पण त्याची प्राणज्योत मात्र मालवलेलीच होती. आधीच पाचजणांच्या मृत्यूचा घाव मनावर झेललेल्या शर्मा कुटुंबाला आणखी एक धक्का बसला. आंजर्ले येथील समुद्रात रविवारी झालेल्या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या आठ वर्षीय अर्पण शर्मा याचा मृतदेह अखेर पाळंदे समुद्रकिनारी आज सापडला. यामुळे या दुर्घटनेत मृत पावलेल्या पर्यटकांची संख्या आता सहा झाली आहे. आंजर्ले येथे रविवारी पुण्यातील ९ पर्यटक समुद्रात ओढले गेले होते. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला होता. यापैकी तिघांना वाचविण्यात आले होते. (प्रतिनिधी)

Web Title: The dead body of the smallpox was finally found