शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

चराठा येथे भरदिवसा चोरी; रोख रक्कम लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 11:10 IST

सावंतवाडी शहरात माजगाव व खासकीलवाडा परिसरातील भरदिवसा दोन घरफोडीच्या घटना ताज्या असतानाच त्याच दिवशी चराठा भागात आणखी एक घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. भरदिवसा तीन घरफोड्या झाल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत.

ठळक मुद्देचराठा येथे भरदिवसा चोरी; रोख रक्कम लंपासदोन दिवसांतील तिसरी घटना

सावंतवाडी : शहरात माजगाव व खासकीलवाडा परिसरातील भरदिवसा दोन घरफोडीच्या घटना ताज्या असतानाच त्याच दिवशी चराठा भागात आणखी एक घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. भरदिवसा तीन घरफोड्या झाल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत.

चराठा येथे लवू राजाराम चव्हाण यांच्या घरी ही चोरी झाली असून, अज्ञात चोरट्याने सुमारे दहा हजारांची रोख रक्कम लंपास केली आहे. याबाबतची तक्रार सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चव्हाण हे सकाळी आपल्या पत्नीसमवेत कामानिमित्त बाहेर गेले होते. दरम्यान, ते शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घरी परतले असता त्यांना घराचा मागील दरवाजा उघडलेल्या अवस्थेत दिसला. चोरट्याने मागील दरवाजाची आतील कडी काढून आत प्रवेश करीत कपाटाच्या लॉकरमधील सुरक्षा कप्प्यातील दहा हजार रुपयांची रोकड लंपास केली.चोरीची घटना उघडकीस येताच त्यांनी रात्री उशिरा सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. शुक्रवारी दुपारच्या सत्रात चोरीच्या वृत्तामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. यात माजगाव-गरड व खासकीलवाडा येथील दोन्ही घरफोडीत सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम मिळून सुमारे ८ लाखांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला होता.

याबाबत भक्ती भरत गवस (रा. खासकीलवाडा) व अनुष्का आनंद देसाई (रा. माजगाव-गरड) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी तक्रार नोंदविली होती. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांच्या हालचालींकडे चोरटे लक्ष ठेवून असल्याचे स्पष्ट होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग